नवी दिल्ली : सोशल मीडियात अपघाताचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत कार एका महिलेच्या अंगावरुन एकदा नाही तर दोनदा जात असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
अपघाताचा हा व्हिडिओ चीनमधील असल्याचं समोर आलं आहे. पहिल्यांदा अपघात एका वृद्धामुळे झाला तर त्याच्याच नातवामुळे पुन्हा दुसऱ्यांदा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात या महिलेला कुठलीही गंभीर दुखापत झाली नाही.
अपघातात ही महिला जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही संपूर्ण घटना रस्त्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनमधील लियानयुंगैंग शहरात २७ डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे. मिस नान नावाची ही महिला रस्ता क्रॉस करत होती त्याच दरम्यान एका कारने तिला धडक दिली.
यानंतर गाडीतून एक व्यक्ती बाहेर उतरतो आणि महिलेला गाडीखालुन बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु करतो. त्याच्या मदतीला आजुबाजुचे नागरिकही येतात आणि त्या महिलेला बाहेर काढतात. मात्र, त्यानंतर लगेचच पुन्हा त्याच कारने महिलेला धडक देत असल्याचं दिसत आहे.
Driver rescues woman he runs over, only for her to be run over again since he forgot to pull the handbrake. Fortunately, she doesn't sustain any major injuries pic.twitter.com/mZmwX4rRC0
— CGTN (@CGTNOfficial) January 13, 2018
कारमधून बाहेर निघताना कारचालकाने हँड ब्रेक लावला नव्हता. ज्यावेळी महिलेला कार खालुन बाहेर काढले त्यानंतर कारमध्ये बसलेल्या तरुणाने गाडी पुन्हा स्टार्ट केली आणि त्या गाडीने महिलेला चिरडलं.