Earth Like Planet Discovered: पृथ्वी बाहेर नवीन ग्रहावरील जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी वैज्ञानिक अथक परिश्रम घेत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याचे दिसत आहे. कारण, शास्त्रज्ञांना ब्रम्हांडात जीवसृष्टी असलेले 24 ग्रह सापडले आहेत. यामुळे पृथ्वी बाहेरील ग्रहावर मानवी वस्ती निर्माण करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या ग्रहांना सुपर-हॅबिटेबल प्लॅनेट असे नाव देण्यात आले आहे. या ग्रहांवर जीवसृष्टीसाठी पृथ्वी किंवा त्यापेक्षा अधिक चांगली स्थिती असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे( Earth-like planets).
ब्रम्हांडात असलेल्या आकाशगंगेत अनेक ग्रह आहेत. या सर्व ग्रहांपैकी पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे जिथे जीवन अस्तित्वात आहे. असाच अनेक आकाश गंगा ब्रम्हांडात अस्तित्वात आहेत. या इतर आकाशगंगामध्ये देखील पृथ्वी सारखे ग्रह असू शकतात. तसेच या ग्रहांवर जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचा देखील शास्त्रज्ञांचा दावा आहे.
वॉशिंग्टन स्टेट युनिव्हर्सिटी आणि टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ बर्लिनचे शास्त्रज्ञ या पृथ्वीसारख्या ग्रहांचा शोध घेत आहेत. वैज्ञानिकांनी जवळपास 4,500 ग्रहांचे परीक्षण केले. या ग्रहांवरील तापमान, खडक तसेच इतर बाबींचा बारकाईने अभ्यास सुरु आहे.
पृथ्वीची वयोमर्यादा सुमारे 450 दशलक्ष वर्षांपेक्षा जास्त आहे. यामुळे जीवनासाठी सर्वोत्तम परिस्थिती 500 ते 800 दशलक्ष वर्षे आयुष्य असलेल्या ग्रहांवर असू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. ग्रहाचा आकार आणि वस्तुमानावरुन देखील ग्रहावरील जीवनाच्या शक्यताच अंदाज लावला जातो. पृथ्वीपेक्षा मोठा असलेल्या खडकाळ ग्रहावर चांगल्या प्रकारची जीवसृष्टी असू शकते. पृथ्वीच्या 1.5 पट वस्तुमान असलेल्या ग्रहाची अंतर्गत उष्णता जास्त काळ टिकून राहण्याची शक्यता जास्त असते. यामुळे त्याचा गाभा वितळलेला आणि त्याचे संरक्षणात्मक चुंबकीय क्षेत्र दीर्घकाळ सक्रिय राहू शकते. अशा स्थितीत जीवसृष्टीच्या उत्पत्तीची शक्यता अधिक असू शकते असं शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. अशा प्रकारचे 24 ग्रह शास्त्रज्ञांनी शोधले आहेत.