Trending News : विज्ञानाची कमाल, आता गर्भात नाही तर फॅक्टरीत तयार होतायत जुळे, कंपनीकडे ऑडर्ससाठी रांग

रशियातील प्रोमोबॉट्स नामक एक कंपनी जुळे रोबोट्स बनवते. या कंपनीची विशेषतः म्हणजे तुमच्यामध्ये असणारे लुक्स किंवा गुण किंवा स्वभाव जसेच्या तशे या रोबोट्समध्ये उतरवण्यात प्रसिद्ध आहे. मागील काही वर्षांमध्ये रशियामध्ये अशा प्रकारचे रोबोट्स बनवण्याचा ट्रेंड वाढतोय.

Updated: Aug 19, 2022, 09:24 PM IST
Trending News : विज्ञानाची कमाल, आता गर्भात नाही तर फॅक्टरीत तयार होतायत जुळे, कंपनीकडे ऑडर्ससाठी रांग  title=

Russian promobot company making twin robots: माणूस दिवसेंदिवस प्रगती करतोय. भारतात 5G येऊ घातलंय, केवळ 5G नव्हे तर आता 6G वर देखील काम सुरु झालंय. याआधी मुलांना जन्म देणं हे माणसाच्या समजण्यापलीकडचं होतं. मात्र, आता IVF तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपण बरेच पुढे निघून आलो आहोत. महिलांच्या गर्भात जेंव्हा दोन स्पर्म्स फ्युज होतात तेंव्हा जुळ्या मुलांचा जन्म होतो असं बोललं जातं. 

सर्वसाधारणपणे जुळ्या मुलांचा स्वभाग हा एकमेकांपासून वेगळा असतो. मात्र गेल्या काही दिवसांत रशियात अशी जुळी मुलं जन्म घेतायत ज्यांचं दिसणं आणि स्वभाव हा एकदम एखाद्या माणसासारखा आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही मुलं गर्भत नव्हे तर एका फॅक्ट्रीमध्ये जन्म घेत आहेत. आता, हे ऐकून तुम्हाला जरा धक्का बसला असेल. चला तर मग जाणून घेऊयात याबाबत रंजक माहिती.  

 रशियातील प्रोमोबॉट्स नामक एक कंपनी जुळे रोबोट्स बनवते. या कंपनीची विशेषतः म्हणजे तुमच्यामध्ये असणारे लुक्स किंवा गुण किंवा स्वभाव जसेच्या तशे या रोबोट्समध्ये उतरवण्यात प्रसिद्ध आहे. मागील काही वर्षांमध्ये रशियामध्ये अशा प्रकारचे रोबोट्स बनवण्याचा ट्रेंड वाढतोय. या कंपनीने असे अनेक रोबोट्स बनवले आहेत.  

ट्वीन रोबो बनवण्याचा ट्रेंड

रिपोर्ट्सनुसार रशियामध्ये प्रोमोबॉट्स नावाची एक कंपनी जुळे रोबोट्स बनवते. ही कंपनी कोणत्याही माणसासारखा हुबेहूब रोबो बनवू शकते. महत्त्वाची बाब म्हणजे या रोबोचा लूक आणि त्याचं वागणं हुभेहूब त्या माणसासारखंच असतं. मागील काही वर्षात रशियात असे रोबो बनवण्याचा ट्रेंड चांगलाच वाढताना पाहायला मिळतोय. या कंपनीने अनेकांचे ट्वीन म्हणजेच जुळे रोबो बनवले आहेत. नुकताच कंपनीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये एका ग्राहकाने ऑर्डर दिल्यानंतर कसा त्याचा ट्वीन रोबो बनवला गेला हे दाखवलं गेलं आहे. 

सुरक्षिततेची काळजीही घेतली जाते

कंपनीने व्हिडीओ शेअर करून याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. या कंपनीत बनवलेले रोबोट्स हे ऑर्डर देणाऱ्या माणसांसारखं काम करतात. या रोबोट्सचा स्वभावही अगदी माणसांसारखा असतो. मात्र, कुणीही याचा गैरवापर करू नये याचीही कंपनी काळजी घेत असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. ही कंपनी केवळ त्यांचाच रोबो बनवते जी माणसं कंपनीत येऊन ऑर्डर देतात. कुणाच्या सांगण्यावरून कुणासारखा दिसणारा रोबोट बनवला जात नाही. कुणीही कुणाच्या चेहऱ्याचा गैरवापर करून दुरुपयोग करू नये म्हणून हा नियम असल्याचं कंपनी सांगते.