युद्धभूमीतून मोठी बातमी! भारतीयांना तातडीने युक्रेनमधलं खारकीव्ह शहर सोडण्याच्या सूचना

किव्ह नंतर आता युक्रेनमधल्या आणखी एका शहरातून भारतीय नागरिकांनी बाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

Updated: Mar 2, 2022, 07:25 PM IST
युद्धभूमीतून मोठी बातमी! भारतीयांना तातडीने युक्रेनमधलं खारकीव्ह शहर सोडण्याच्या सूचना title=

Russia Ukraine War : युक्रेनमधल्या भारतीयांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी. भारतीय दुतावासानं (Indian Embassy) भारतीयांना तातडीनं खारकीव्ह (Kharkiv) सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व भारतीयांना खारकीव्हमधून थेट पिसोचीन, बेझलुडोवका आणि बेबायेच्या दिशेनं जाण्यास सांगण्यात आलं आहे. 

भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना
युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान भारत सरकारकडून एक मार्गदर्शक सूचना (Advisory) जारी करण्यात आली आहे. युक्रेनमधील खारकीव्हमध्ये असलेल्या सर्व भारतीयांनी सुरक्षिततेसाठी ताबडतोब शहर सोडावं, असे त्यात म्हटलं आहे.

रात्रीपर्यंत शहर सोडण्याच्या सूचना
युक्रेनमधील भारतीय दूतावासाने खारकीव्हमधील भारतीय नागरिकांना तातडीची सूचना जारी केली आहे. त्यात खारकीव्ह सोडून शक्य तितक्या लवकर पिसोचिन,  बेझलुडोवका आणि बेबायेच्या दिशेने जाण्यास सांगण्यात आलं आहे. भारतीय वेळेनुसार सर्व भारतीयांना आज रात्री साडेनऊपर्यंत शहर सोडण्यास सांगण्यात आलं आहे.

खारकीव्हमध्ये धोका वाढला
सध्या खार्किवमध्ये रशियन सैन्याकडून जोरदार हल्ले केले जात आहेत. अशा परिस्थितीत तेथे अडकलेल्या सर्व भारतीयांना खारकीव्ह सोडण्याचा सल्ला देण्यात आला  आहे. रशियन सैन्याने खार्किवमधील सिटी काऊन्सीलच्या इमारतीवर भीषण हल्ला केला आहे.