Google Fined By Russia Court : कंपन्यांवर दंडात्मक कारवाई होणं हे काही नवीन नाही. सरकार किंवा संबंधित एजन्सी या वेळोवेळी नियमांचं उल्लंघन केल्यावर कंपन्यांना दंड ठोठावतात. पण जर आम्ही तुम्हाला सांगितले की एखाद्या देशाने कंपनीवर इतका दंड लावलाय की एवढा पैसा संपूर्ण जगातही उपलब्ध नाही, तर तुम्हाला ही घटना काल्पनिक वाटेल पण हे खरंय. होय! ही घटना घडलीये रशियामध्ये. रशियन कोर्टाने (Russia) थेट गुगलवर (Google) असा दंड ठोठावला असून ज्याची रक्कम ऐकून कोणालाही घाम फुटेल. रशियन कोर्टाने गुगलवर तब्बल 2.5 डेसिलियन डॉलरचा दंड ठोकला असून ही रक्कम संपूर्ण जगाच्या GDP पेक्षा 100 ट्रिलियन डॉलर्सने जास्त आहे.
रशियन कंपनीने गुगलवर केलेल्या दंडात्मक कारवाईचे मुख्य कारण हे गुगलद्वारे क्रेमलिन समर्थक मीडिया आउटलेट्सचे अकाउंट्स पुनर्संचयित न करण्याशी संबंधित आहे. ही लढाई चार वर्षांपासून सुरु होती. जेव्हा गुगलने क्रेमलिन समर्थक मीडिया चॅनल्स जसं की जारग्रेड टीवी आणि आरआईए, के यूट्यूबच्या अकाउंट्सला ब्लॉक करणं सुरु केलं. गुगलने ही कारवाई तेव्हा केली जेव्हा त्यांना कळले की या चॅनेल्सने कायदा आणि व्यावसायिक नियमांचे उल्लंघन केले आहे. यानंतर गुगलवर दररोज 100,000 रूबल म्हणजे (जवळपास 87,000 रुपये) इतका दंड लावण्यात आला. जो वाढत वाढत 2.5 undecillion पर्यंत पोहोचला.
रशियातील रुस न्यायालयालाने गुगलवर 2.5 डेसिलियन डॉलरचा दंड लावला आहे. हा दंड इतका मोठा आहे की सध्याच्या घडीला संपूर्ण जगात उपलब्ध असलेल्या पैशांपेक्षा ही रक्कम मोठी आहे. तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचे तर, डेसिलियन समजण्यासाठी 1 अंकानंतर तब्बल 36 शुन्य लावावे लागतील. एक हजार अब्ज म्हणजे एक ट्रिलियन, एक हजार ट्रिलियन म्हणजे एक क्वाड्रिलियन आणि एक हजार क्वाड्रिलियन म्हणजे एक डेसिलियन. तर ब्रिटिश मोजणीत ही संख्या 60 शून्यांपर्यंत पोहोचते.
हेही वाचा : Muhurat Trading साठी तयार आहात ना? जाणून घ्या Timings अन् चर्चेतील शेअर्सबद्दल
रशियाने गुगलवर .5 डेसिलियन डॉलरचा दंड लावल्यावर सोशल मीडियावर मजेदार मिम्स व्हायरल होत आहेत. काही लोकांना रशियाने खरंच एवढा दंड लावलाय हे खरं वाटतं नाही तर काहींनी यावर विविध विचार व्यक्त केले. सोशल मीडियावर काही लोकांचे म्हणणं आहे की हा दंड केवळ राजकीय शस्त्र असून रशियाचा मुख्य उद्देश हा गुगलला धडा शिकवणे हा याचा खरा उद्देश आहे.
रूस आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे पश्चिमी देशांद्वारे लागलेल्या निर्बंधांचे पालन करताना गुगलने पहिल्या पासूनच रूसमध्ये त्यांच्या जाहिराती बंद केल्या होत्या. आता हे पाहणं उत्सुकतेचं असेल की गुगल ही न्यायालयीन लढाई कशी लढतो याकडे सर्वांचे लक्ष असेल.