लंडन : रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरसच्या आजारावर विकसित करण्यात आलेल्या 'लस'ची अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे. जगातील पहिला देश म्हणून रशिया ठरला आहे. रशियाने या 'लस'साठी मंजुरी दिली आहे. कुठल्याही सरकारच्या आरोग्य मंत्रालयाची मंजुरी मिळवणारी ही जगातील पहिली लस ठरली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या 'लस'ला मंजुरी दिल्याची माहिती दिली. माझ्या मुलीला सुद्धा ही लस देण्यात आली आहे, असे पुतिन यांनी सांगितले. याबाबतचे वृत्त एएनआय आणि रॉयटर्सने दिले आहे.
Russia becomes first country to register COVID-19 vaccine
Read @ANI Story | https://t.co/wRyVyVlqrO pic.twitter.com/xC4DdXLZJl
— ANI Digital (@ani_digital) August 11, 2020
चीनमधूल कोरोनाचा प्रसास जगभर झाला. या कोविड-१९ ला रोखायचे कसा असा प्रश्न जगाला पडला होता. जगात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. हजारोने लोकांचे बळी गेलेत. कोरोनाची बाधा होणारी संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यावर काही प्रमाणात नियंत्रण आणण्यात यश आले तरी प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे कोरोनावर औषध तयार करण्यासाठी जगात स्पर्धा लागली. अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन, भारत आदी देशांत यावर संशोधन करण्यात येत आहे. मात्र, अमेरिका ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स या देशांच्या आधी रशियाने कोरोना व्हायरसवरील लसची निर्मिती केली. त्याची अधिकृत नोंदणीही केली आहे.
सप्टेंबर आणि ऑक्टोंबरपासून या लसची निर्मिती करण्याचा रशियाचा मानस होता. रशियात राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या अध्यक्षतेखाली लस निर्मितीबद्दल एक बैठक पार पडली होती. त्या बैठकीत रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन एकच गोष्ट म्हणाले होते की, कोरोना व्हायरसवर आपण जी लस बनवू, त्याबद्दल आपल्याला पूर्ण खात्री असली पाहिजे तसेच काळजीपूर्वक, संतुलन ठेवून आपल्याला कोरोनावर लसीची निर्मिती करायची आहे.
रशियाच्या गामालिया इंस्टिट्यूट ऑफ अॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने ही लस विकसित केली आहे. दोन महिन्यापेक्षा कमी कालावधीत या लसची मानवी चाचण्या झाली आहे. लस सुरक्षितता आणि परिणामकारकता तपासण्यासाठी अंतिम फेजच्या क्लिनिकल चाचण्या सुरु राहणार असल्या तरी सर्वसामान्यांसाठी लस देण्याचा कार्यक्रम सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.