नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान मोदींचा हा रशिया दौरा आधीच्या दौऱ्यापेक्षा वेगळा असणार आहे. रशियामधील भारताचे राजदूत पंकज सारन यांनी माहिती दिली की, पुन्हा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर फक्त 2 आठवड्यात पुतीन आणि पंतप्रधान मोदींची ही भेट होत आहे.
मोदींचा हा दौरा वेगळा आहे कारण स्वत: राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी मोदींना आमंत्रित केलं आहे. मोदी आणि पुतिन यांच्यातली ही भेट महत्त्वपूर्ण आणि वेगळी असणार आहे. पुतिन मोदींसोबत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं रशियाचे अधिकारी एयरपोर्टवर स्वागत करणार आहेत. यानंतर त्यांची पुतिन यांच्याशी भेट होणार आहे. यावर्षीच पुतिन हे देखील भारत दौऱ्यावर येणार आहेत. मागील 10 दिवसात पुतिन यांनी अनेक देशांच्या प्रमुखांची भेट घेतली आहे. मोदी आणि पुतिन यांची यावर्षातली ही पहिली भेट आहे.