'पनामा घोटाळा' जगासमोर आणणाऱ्या महिला पत्रकाराचा बॉम्बस्फोटात मृत्यू

जगभरात चर्चिला गेलेला 'पनामा घोटाळा' लोकांसमोर आणणारी पत्रकार डाफ्ने कारुआना गॅलिजिया हिचा एका बॉम्बस्फोटात मृत्यू झालाय. 

Updated: Oct 17, 2017, 06:34 PM IST
'पनामा घोटाळा' जगासमोर आणणाऱ्या महिला पत्रकाराचा बॉम्बस्फोटात मृत्यू  title=

नवी दिल्ली : जगभरात चर्चिला गेलेला 'पनामा घोटाळा' लोकांसमोर आणणारी पत्रकार डाफ्ने कारुआना गॅलिजिया हिचा एका बॉम्बस्फोटात मृत्यू झालाय. 

५३ वर्षीय गॅलिजिया सोमवारी आपल्या घरापासून निघून थोड्या अंतरावरच गेली असेल तेवढ्यात त्यांच्या गाडीत बॉम्ब फुटला... या बॉम्बस्फोटानं गाडीच्या आणि गॅलिजियाचे तुकडे-तुकडे केले.

'रनिंग कॉमेन्ट्री' नावाचा एक स्वतंत्र ब्लॉगही गॅलिजिया चालवत होत्या. या ब्लॉगमध्ये त्यांनी काही नेत्यांवर निशाणा साधत मोठ्या स्तरावरील भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. गॅलिजिया यांनी माल्टाच्या पंतप्रधान यूसुफ मस्कट यांच्यावरही घोटाळ्याचा आरोप केला होता. पनामा घोटाळ्यात मस्कट यांच्या पत्नीच्या नावावर असलेल्या एका कंपनीनं खूप मोठ्या प्रमाणात पैशांची अफरा-तफर केल्याचा दावा गॅलिजिया यांनी केला होता. यानंतर मस्कट यांनी हे आरोप बिनबुडाचे असल्याचं सांगत गॅलिजिया यांच्यावर खटला दाखल केला होता. 

पनामा 'टॅक्स हेवन' आहे, हे गॅलिजियानंच जगासमोर उघड केलं होतं... जगभरातील श्रीमंत व्यक्तींचं पनामा कनेक्शन यानंतरच उघड झालं होतं. 

गॅलिजिया हिच्या मृत्यूसंबंधी माहिती देणाऱ्याला १५ लाखांचा इनाम देण्याची घोषणा विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन एसान्ज यांनी केलीय. गॅलिजिया यांचा मुलगाही पत्रकार आहे. सध्या त्यानं गॅलिजिया यांच्या मृत्यूची चौकशी करण्याऱ्या मॅजिस्ट्रेटला बदलण्यासाठी एक अर्ज कोर्टात दाखल केलाय.