Viral : पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून 32 वर्षांपूर्वीचा फोटो शेअर... नेटकऱ्यांकडून जोरदार ट्रोल

अलीकडच्या काळात, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांचा एक जुना फोटो शेअर केला आहे,

Updated: Aug 31, 2021, 03:24 PM IST
Viral : पाकिस्तानच्या पंतप्रधानांकडून 32 वर्षांपूर्वीचा फोटो शेअर... नेटकऱ्यांकडून जोरदार ट्रोल title=

मुंबई : सोशल मीडियावर आपला शेजारील देश पाकिस्तानची दररोज चेष्टा सुरू असते. याबद्दल सोशल मीडियावर मीम्स देखील फिरत असतात. कधी हे विनोद पैशांबद्दल तर कधी ते पाकिस्तानातील इतर मुद्द्यांविषयी असतात. तर कधी तेथील क्रिकेटरमुळे देखीस सोशल मीडियावर विनोद केला जातो. अलीकडच्या काळात, पाकिस्तानच्या वजीर-ए-आझमची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. ज्यासाठी लोक त्यांना खूप ट्रोल करत आहेत.

अलीकडच्या काळात, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांचा एक जुना फोटो शेअर केला आहे, जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वतः त्यांच्या पोस्टमध्ये याबद्दल माहिती दिली, आणि त्यांनी सांगितले की, हा फोटो 32 वर्षांपूर्वीचा आहे म्हणजे 1989 चा आहे.

या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, इम्रान खान स्कार्दू नदीवर एका बोटीत बसले आहेत आणि त्यांनी बॅटमॅन कॅपही घातली आहे. इम्रान खानने इन्स्टाग्रामवर हा फोटो पोस्ट करताच, ट्रोलर्सनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एका यूजरने कमेंट करुन त्याखाली जोकर लिहिली आहे, तर दुसऱ्या यूजरने त्यांच्या बॅटमॅनच्या टोपीची खिल्ली उडवली आहे. या व्यतिरिक्त, अनेक यूजर्सने यावर मजेदार कमेंट्स केल्या आहेत. ही बातमी लिहिण्यापर्यंत, इंस्टाग्रामवर 1.36 लाखांहून अधिक लोकांनी या फोटोला लाईक केले आहे आणि 16 हजार पेक्षा जास्त लोकांनी यावर कमेंट्स केल्या आहेत.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची मस्करी केली जाण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी, ते एका उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गेले होते आणि ते त्याचे नाव विसरले, ज्यासाठी देखील त्यांना खूप ट्रोल केले गेले.