चीन 'असं' वाढवतंय पाकिस्तानचं बळ; सागरी मार्गानं वाढणार भारताच्या अडचणी

पाहा ही मोठी घडामोड 

Updated: Nov 9, 2021, 12:06 PM IST
चीन 'असं' वाढवतंय पाकिस्तानचं बळ; सागरी मार्गानं वाढणार भारताच्या अडचणी title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

नवी दिल्ली : पाकिस्तान आणि चीन या दोन्ही राष्ट्रांनी टाईप 054 युद्धनौकांसाठी 2017 मध्ये करार केला होता. या कराराअंतर्गत पहिली युद्धनौकामागील वर्षी ऑगस्ट महिन्यात तयार झाली. ज्यानंतर जवळपास 1 वर्षापर्यंत सागरी हद्दीमध्ये याचं परीक्षण करण्यात आलं.  

भारताला हिंदी महासागराच्या मार्गानं विळखा घालण्यासाठी चीनकडून वारंवार प्रयत्न करण्यात येत आहेत. याच प्रयत्नांमध्ये आता पाकिस्तान चीनला काही नव्या प्रणालीच्या माध्यमातून मदत करत आहे. नुकतंच पाकिस्तानला चीननं टाईप 054 स्टील्थ युद्धनौका देऊ केली आहे. दावा करण्यात आल्यानुसार ही युद्धनौका अगदी सहजपणे कोणत्याही रडारची नजर चुकवू शकते. या युद्धनौकेमध्ये दूरवर मारा करणआरे मिसाईल आणि एका मिनिटामध्ये अनेक राऊंड फारिंग करणारी अत्याधुनिक तोफही आहे. 

2017 मध्ये झाला मोठा करार 
पाकिस्तान आणि चीनमध्ये युद्धनौकांचा हा करार 2017 मध्ये झाला होता. सुरुवातीला काही कारणांमुळे या युद्धनौकेबाबत काही त्रुटी समोर आल्या होत्या. युद्धनौका सुरु असताना त्यातून येणारा धूर शत्रूला सहजपणे दिसू शकतो असं सांगण्यात आलं होतं. ज्यानंतर पुन्हा एकदा या नौकांचं परीक्षण करण्यात आलं होतं. जिथं या इंजिनात सुधारणा करण्यात आल्या. 

चीनकडे अशा 30 युद्धनौका 
टाईप 054 या प्रकाराती जवळपास 30 युद्धनौका चीनच्या नौदलाचा मुख्य आधार आहेत. ही चीनची सर्वात प्रगत आणि सुसज्ज युद्धनौका आहे. शांघाई येथील हुडोंग झोंगहुआ येथील शिपयार्डमध्ये या युद्धनौका तयार करण्यात आल्या आहेत. 

युद्धनौकेमध्ये कोणती शस्त्र? 
चीनची निर्मिती असणाऱ्या या युद्धनौकेमध्ये सरफेस, सब सरफेस आणि अँटी एअर शस्त्र आहेत. यामध्ये इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, हवा आणि जमिनीवर लक्ष ठेवण्यासाठीची उपकरणं आणि सेंसर लावण्यात आला आहे. या युद्धनौकेमुळं पाकिस्तानचं बळ आणखी वाढलं आहे. ज्यामुळे आता पुढे पाकिस्तान कोणती वाकडी चाल चालणार यावर भारतीय संरक्षण यंत्रणांची करडी नजर असणार आहे.