'हमने घर मे घुसके मारा'; Pulwama हल्ल्याबाबत पाकिस्तानची कबुली

अखेर त्या भ्याड हल्ल्याविषयीची धक्कादायक माहिती समोर   

Updated: Oct 29, 2020, 06:48 PM IST
'हमने घर मे घुसके मारा'; Pulwama हल्ल्याबाबत पाकिस्तानची कबुली  title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : साऱ्या देशाला हादरवणारी घटना १४ फेब्रुवारी २०१९ ला जम्मू काश्मीरच्या पुलवामा Pulwama येथे घडली होती. ज्याबाबत आता पाकिस्तानचा कबूलनामा समोर आल्यामुळं एकच खळबळ माजली आहे. शेजारी राष्ट्राचे मंत्री फवाद चौधरी यांच्या म्हणण्यानुसार पाकिस्ताननंच हा हल्ला केला आहे. 

पाकिस्तानच्या राष्ट्रीय संसदेत म्हणजेच Pakistan National Assembly मध्ये चौधरी यांनी दावा केला आहे की भारतातील पुलवामा येथे करण्यात आलेला हल्ला म्हणजे इमरान खान सरकारला मिळालेलं एक मोठं यश होतं. आम्ही हिंदुस्तानला घरात घुसून मारलं होतं, या शब्दांत त्यांनी या हल्ल्याबाबचा दावा करत अनेकांच्या नजरा वळवल्या. 

दक्षिण काश्मीरमध्ये असणाऱ्या पुलवामा येथे रस्त्यावरुन जाणाऱ्या सीआरपीएफच्या ताफ्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. ज्यामध्ये तब्बल ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचे पडसाद साऱ्या जगात उमटले होते. 

 

भीतीपोटीच केली होती अभिनंदन वर्धमान यांची सुटका.... 

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान  (Abhinandan Varthaman) पाकिस्तानने केवळ शांततेसाठी सुटका केली नाही. तर, पाकिस्तानला भारताशी असणारे संबंध बिघडवायचे नव्हते, ही बाब आता समोर येत आहे. मात्र, पाकिस्तानला जास्त भीती होती ती भारत त्यांच्यावर हल्ला करेल याचीच. अभिनंदनच्या मायदेशी परतल्यानंतर पाकिस्तानी खासदार अयाज सादिक (ayaz sadiq) यांनी इम्रान सरकारची भीती सर्वांसमोर आणली. 
विंग कमांडर अभिनंदन यांच्या सुटकेबद्दल पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan आणि परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांच्यात चर्चा झाली होती. कुरेशी यांनी असेही म्हटले होते की, भारत पाकिस्तानवर हल्ला करणार आहे, त्यामुळे अभिनंदन यांना सोडणे आवश्यक आहे, असा दावा अयाझ यांनी केला आहे.