भारताला आणखी एका देशाकडून ऑक्सीजन, वेंटिलेटर आणि पीपीई किटची मदत

आणखी एका देशाची भारताला मदत

Updated: Apr 26, 2021, 02:44 PM IST
भारताला आणखी एका देशाकडून ऑक्सीजन, वेंटिलेटर आणि पीपीई किटची मदत title=

मुंबई: अमेरिकेनंतर ऑस्ट्रेलियालाही भारताच्या मदतीसाठी पुढे आला आहे. ऑस्ट्रेलिया कोरोना विषाणूमुळे संकटात सापडलेल्या भारताला ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि पीपीई कीट पाठवणार आहे. आरोग्यमंत्री ग्रेग हंट यांनी सोमवारी म्हटलं की, कोरोनाच्या उद्रेकातून त्रस्त असलेल्या भारताला लवकरच दिलासा मिळेल. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियासह जगातील अनेक देशांकडून भारताला मदत देण्यात आली आहे. या देशांकडून ऑक्सिजनसह सर्व आवश्यक वैद्यकीय मदत पाठविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी भारताला मदतीची ऑफर दिली आणि ते म्हणाले की, ऑस्ट्रेलिया भारताबरोबर आहे. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान म्हणाले की, भारत कोरोनाच्या दुसर्‍या कठीण लाटेचा सामना करत असताना ऑस्ट्रेलिया आपल्या मित्रांच्या मागे उभा आहे. भारत सामर्थ्यवान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मी भागीदारीत या जागतिक आव्हानावर काम करत राहू.'

फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांनीही मदतीची ऑफर दिली. ते म्हणाले, 'मला भारतीय जनतेबरोबर एकतेचा संदेश द्यायचा आहे. या संघर्षात फ्रान्स आपल्या सोबत आहे. या संकटाने कोणालाही सोडले नाही. आम्ही आधार द्यायला तयार आहोत.'