omicron व्हायरसचा धोका, Who चा आशिया खंडातील देशांना सावधगिरीचा इशारा

कोरोना महामारी पुन्हा मागगुटीवर येऊन बसली आहे. आफ्रिकन देशांमध्ये नव्या व्हायरसचा धोका वाढला आहे.

Updated: Nov 27, 2021, 08:44 PM IST
omicron व्हायरसचा धोका, Who चा आशिया खंडातील देशांना सावधगिरीचा इशारा title=

मुंबई : WHO सल्लागार समितीने दक्षिण आफ्रिकेत प्रथमच आढळलेल्या कोरोनाच्या नवीन प्रकाराला (omicron) अत्यंत संसर्गजन्य आणि चिंताजनक प्रकार म्हटले आहे. त्याला ओमिक्रॉन (omicron) असे नाव देण्यात आले आहे. यासोबतच डब्ल्यूएचओने दक्षिणपूर्व आशिया क्षेत्रातील देशांमध्ये पाळत ठेवणे, सार्वजनिक आरोग्य मजबूत करणे आणि लसीकरण व्याप्ती वाढवण्याचा सल्ला दिला आहे. जागतिक आरोग्य संस्थेने सण आणि उत्सवांना सर्व सावधगिरीचे उपाय तसेच गर्दी आणि मोठे मेळावे टाळण्यास सांगितले आहे. (Who warn ashian countries abaout Omiron Virus)

WHO चे दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्राचे प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रपाल सिंह म्हणाल्या की, या प्रकाराबद्दल निराश होण्याची गरज नाही. आग्नेय आशियातील बहुतेक देशांमध्ये कोविड-19 ची प्रकरणे कमी होत असली तरी, जगाच्या इतर भागांमध्ये चिंतेचा एक प्रकार असलेला नवीन विषाणू धोका निर्माण करतोय. कोरोनाला पराभूत करण्यासाठी आपण आपले काम सुरूच ठेवले पाहिजे.

बाहेरील देशांतून येणाऱ्या धोक्यांकडे लक्ष वेधलं

ते म्हणाले की देशांनी दक्षता आणि पाळत ठेवली पाहिजे. आंतरराष्ट्रीय प्रवासातून संसर्ग होण्याच्या जोखमीचे मूल्यांकन केले पाहिजे. तसेच, ते रोखण्यासाठी शक्य ते सर्व पावले उचलली पाहिजेत. एवढेच नाही तर संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी सामाजिक उपाययोजना सुरू ठेवाव्यात. सर्व प्रथम, संरक्षणात्मक उपाय लागू केले पाहिजेत. येत्या काळात व्हायरसमध्ये आणखी बदल होतील, असे डॉ. खेत्रपाल यांनी सांगितले की, ही महामारी दीर्घकाळ टिकेल.

डॉ. खेत्रपाल म्हणाल्या की, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकांनी मास्क घालावे, सुरक्षित अंतर राखावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, हात स्वच्छ ठेवावे, खोकला-शिंकाच्या संपर्कात येऊ नये, वेळेवर लसीकरण करावे. 

भारतासह जगातील अनेक देशांमध्ये हाहाकार माजवणाऱ्या कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटपेक्षाही धोकादायक असलेल्या या नवीन प्रकाराबाबत डब्ल्यूएचओच्या सल्लागार समितीची शुक्रवारी बैठक झाल्याची माहिती आहे. युनायटेड नेशन्सची जागतिक आरोग्य संस्था WHO ने याला 'चिंतेचा व्हायरस' म्हणून वर्गीकृत केले आहे. या श्रेणीतील विषाणू अत्यंत संसर्गजन्य मानले जातात. डेल्टा व्हेरियंट देखील त्याच श्रेणीत ठेवण्यात आला होता.

या प्रकारात खूप उच्च जोखीम असल्याचे सांगितले जात आहेत. डॉ.खेत्रपाल यांनी लस घेतल्यानंतरही सर्वांनी काळजी घ्यावी, असा सल्ला दिला. यामुळेच गंभीर परिस्थिती पाहता इतर अनेक देशांमध्ये या प्रकाराचे आगमन रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की हा प्रकार किती धोकादायक आहे हे समजून घेण्यासाठी संशोधक सतत काम करत आहेत.

हा प्रकार दिसण्यापूर्वीच युरोपातील अनेक देशांमध्ये आणि ब्रिटन, जर्मनी आणि रशियासह इतर प्रदेशांमध्ये कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढत होती. रशियामध्ये या महामारीमुळे विक्रमी संख्येने लोकांचा मृत्यू झाला होता. आता हा नवा प्रकार समोर आल्यानंतर जगात घबराट पसरली आहे. ब्रिटन, इटली आणि इस्रायलसह अनेक देशांनी दक्षिण आफ्रिका, लेसेटो, बोत्सवाना, झिम्बाब्वे, मोझांबिक, नाबिया आणि इस्वाटिनीला जाणारी उड्डाणे स्थगित केली आहेत.

अनेक देशांनी कठोर पावले उचलली

नेदरलँडसह इतर अनेक देश अशाच उपाययोजना करण्याच्या विचारात आहेत. जर्मनी या देशांच्या उड्डाणांवरही बंदी घालू शकतो. जपानने म्हटले आहे की शुक्रवारपासून या देशांतून येणाऱ्या लोकांना 10 दिवस सरकारी क्वारंटाईन सेंटरमध्ये सक्तीने राहावे लागेल. यादरम्यान त्यांची तीन वेळा कोरोना चाचणीही केली जाणार आहे. हा प्रकार दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांमध्ये बोस्टवाना आणि हाँगकाँगमध्ये आढळून आला आहे. इस्रायलमध्ये मलावीहून आलेल्या एका व्यक्तीला याची लागण झाल्याचे आढळून आले आहे.