लंडन : अद्याप कोविड १९चं व्यापक लसीकरण झालेलं नाही. त्याचा किती उपयोग होईल, याचीही शंका आहे. तशात आता ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार समोर आलाय. दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये 'सार्सकोव टू' हा नवा कोरोना व्हायरस आढळून आला आहे. या व्हाररसचे एक हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्याची माहिती संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोमवारी देण्यात आली.
कोविड-१९ व्हायरसपेक्षा सार्सकोव टूचा फैलावही अधिक वेगानं होत असल्याची धक्कादायक माहिती ब्रिटनचे आरोग्य राज्यमंत्री मॅट हँकॉक यांनी दिली. कारण केंट काऊंटीमध्ये गेल्या आठवड्यातच याचा पहिला रूग्ण आढळून आला होता. शिवाय सध्या कोविड १९साठी शोधली गेलेली लस सार्सकोव टूवर किती परिणामकारक असेल, याचीही शंका आहे. ब्रिटनने याबाबत जागतिक आरोग्य संघटनेला माहिती दिली आहे.
ब्रिटनमध्ये कोरोनाची स्थिती खूप गंभीर बनत आहे. दक्षिणपूर्व भागात राहणाऱ्या १ कोटी लोकांवर टियर-3 शटडाऊन लागू करण्यात आला आहे. देशाचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. बुधवारी सकाळपासून नियम लागू होतील. यानंतर पुन्हा एकदा व्यवसायाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
लंडन व्यतिरिक्त हर्टफोर्डशायर आणि एसेक्स मध्ये लॉकडाउन असेल. हे निर्बंध देशाच्या 60% लोकसंख्येस लागू होतील. 23 डिसेंबरला नियम शिथिल केले जातील. सोमवारी युकेमध्ये 20,263 नवे रुग्ण आढळले. मागच्या सोमवारच्या तुलनेत ते 3 पट अधिक होते.