NASA Mission Moon: अवकाश आणि त्याच्याशी संबंधित बहुतांश मुद्द्यांवर संशोधन आणि संक्षिप्त स्वरुपातील निरीक्षण करणारं NASA पुन्हा एकदा एका नव्या मोहिमेसाठी सज्ज झालं आहे. बुधवारी (आज) अमेरिकन स्पेस एजंन्सी नासा त्यांची चंद्रयाम मोहिम ‘आर्टेमिस-1’ तिसऱ्यांदा लाँच करत आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 11 वाजून 45 मिनिटांपासून दुपारी 1 वाजून 34 मिनिटांपर्यंत ही मोहिक फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर इथं होणार होती. यापूर्वी सदर मोहिमेसाठी 29 ऑगस्ट आणि 3 सप्टेंबरलाही प्रयत्न करण्यात आले होते. पण, काही तांत्रिक अडचणींमुळे आणि थराब हवामानामुळं ही मोहिम टाळण्यात आली होती.
नासा या मोहिमेच्या माध्यमातून मानवाला चंद्रावर पाठवण्याची तयारी करत आहे. ही मोहिम एकूण तीन भागांमध्ये विभागली गेली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात आर्टेमिस-1 चं रॉकेट चंद्राच्या कक्षेपर्यंत जाईल. जिथं तो काही सॅटेलाईट्स सोडून स्वत:च्य कक्षेत स्थिरावेल.
आर्टेमिस – 2 2024 मध्ये लाँच केलं जाणार आहे. यामध्ये काही अवकाशयात्रीही असतील, पण ते चंद्राच्या कक्षेतूनच परत येणार आहेत. त्यांना चंद्रावर पाऊल ठेवता येणार नाही. या मोहिमेअंतर्गत जेव्हा एखादा मानव चंद्रावर जाईल तेव्हा तो तब्बल 50 वर्षांनंतर रचला जाणारा इतिहास ठरणार आहे. कारण यापूर्वी हे 1972 च्या डिसेंबर महिन्यात अपोलो मोहिमेअंतर्गत मानवाला चंद्रावर पाठवण्यात आलं होतं.
आर्टेमिस -3 वर तिसऱ्या टप्प्यात काम होणार आहे. या मोहिमेत चंद्रावर जाणारे अवकाशयात्री चंद्रावर पाऊल ठेवू शकणार आहेत. ही मोहिम 2025 किंवा 2026 मध्ये पार पडू शकते. या मोहिमेअंतर्गत पहिल्यांदाच महिलासुद्धा मोहिमेत सहभागी असणार आहेत.