जपानमध्ये शिंजो आबे विजयासमीप

जपानमध्ये होत असलेल्या मध्यावधी निवडणुकीत पंतप्रधान शिंजो आबे विजयाच्या समीप असल्याचे प्रथम दर्शनी चित्र आहे. या वेळी आबे यांना जनतेने कौल दिल्यास जगातील तिसरी महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपानची अर्थव्यवस्था रूळावर आणण्याचे तसेच, उत्तर कोरीयाबाबत असलेले धोरण अधिक कडक करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Oct 23, 2017, 09:05 AM IST
जपानमध्ये शिंजो आबे विजयासमीप title=

टोकियो : जपानमध्ये होत असलेल्या मध्यावधी निवडणुकीत पंतप्रधान शिंजो आबे विजयाच्या समीप असल्याचे प्रथम दर्शनी चित्र आहे. या वेळी आबे यांना जनतेने कौल दिल्यास जगातील तिसरी महासत्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जपानची अर्थव्यवस्था रूळावर आणण्याचे तसेच, उत्तर कोरीयाबाबत असलेले धोरण अधिक कडक करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल.

टीबीएएस या खासगी संस्थेने केलेल्या जनमत चाचणीत हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या अंदाजानुसार, आबे यांच्या कॉन्झर्वेटीव्ह आघाडीला एकूण ४६५ पैकी ३११ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, जपानमधील आघाडीचे दैनिक 'योमिउरी’ने आपल्या संकेतस्थळावरील वृत्तात म्हटले आहे की, आबे हे मोठ्या फरकाने विजयी होण्याची शक्यता असून, ते विजयाच्या समीप आहेत.

आबे यांनी जर दोन तृतियांश बहुमताने (४६५ पैकी ३११) सत्तेत वापसी केली तर, जपानला उत्तर कोरियाच्या वाढत्या अण्वस्त्रसज्जतेला अटकाव घालण्याच्या धोरणाला अधिक बळकटी मिळू शकते. जपान हा अमेरिकेचा प्रमुख क्षेत्रिय सहकारी आहे. तसेच, अशिया खंडातील मोठी अर्थव्यस्थाही. दरम्यान, जपामध्ये स्थानिक वेळेनुसार सकाळी ७ वाजता मतदानास सुरूवात झाली. वेगवान वारे आणि मुसळधार पावसामुळे मतदानात अडथळा आला.

निवडणूक विश्लेशकांच्या निरिक्षणानुसार आबे यांच्या लिबरल डेमॉक्रॅटिक पक्षाला ( एलपीडी) कमजोर असलेल्या विरोधी पक्षांमुळे चांगलाच फायदा झाला. आबे यांच्या विरोधात उभे राहिलेला विरोधी पक्ष काही दिवसांपूर्वीच निर्माण झाला आहे. टोकियोच्या गव्हर्नर यूरिको कोइको यांनी 'पार्टी ऑफ होप'ची निर्मीती केली. आणि त्यांनी आबे यांच्या विरोधात निवडणूक लढवली. यूरिको यांच्या पक्षाला पदार्पणातच ५० जागा मिळण्याची शक्यता आहे. जपानच्या संसदेच्या कनिष्ट सभागृहासाठी असलेल्या ४६५ जागांसाठी ११८० उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणूकीचे वैशिष्ट्य असे की, या वेळी १८-१९ वयोगटातील यूवक पहिल्यांदाच निवडणूकीत मतदान करत आहेत.