जगात नोकरकपातीची लाट, तुमची नोकरी धोक्यात?

ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर एलॉन मस्क (Elon Musk) यांनी धडाधड कर्मचाऱ्यांना घरी बसवायला सुरुवात केली.   

Updated: Nov 9, 2022, 12:04 AM IST
जगात नोकरकपातीची लाट, तुमची नोकरी धोक्यात? title=

Job News : जगभरात कर्मचारी कपात (Cost Cutting) सुरु झाली आहे.  भारतातही (India) याचा फटका बसू लागलाय. हजारोंच्या संख्येनं कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला जातोय. त्यामुळे चिंता व्यक्त केलीय जातेय. तुमची नोकरी धोक्यात असू शकते कारण जगभरात नोकरकपातीची लाट आलीय. मंदीच्या धास्तीनं जगभरातील बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून (Multinational Company) कर्मचारी कपात सुरु झालीय. विशेषत: आयटी कंपनीत (IT Company)काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा फटका बसणार आहे. (meta and global online community platform Brainly have announced staff reduction)

ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर एलॉन मस्क (Elon Musk) यांनी धडाधड कर्मचाऱ्यांना घरी बसवायला सुरुवात केली. त्यानंतर आता मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg) यांची मेटा आणि जागतिक ऑनलाईन कम्युनिटी प्लॅटफॉर्म ब्रेनलीनं कर्मचारी कपात जाहीर केलीय. 

जगात नोकरकपातीची लाट

ट्विटरनं  3 हजार 700 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं. सीगेटमधून 3000 जणांच्या नोकऱ्या गेल्या. मायक्रोसॉफ्टमधून 1000 कर्मचाऱ्यांना काढलं. स्नॅप चॅटमधून 20 % कर्मचारी कपात करण्यात आली. ई-कॉमर्स स्टार्टअप उडानमधून 350 नोकऱ्या गेल्या. इंटेलमध्येही मोठ्या प्रमाणात नोकर कपातीचं संकट आहे.

ब्रेनलीनं भारतातील 35 पैकी 30 लोकांना नोकरीवरून काढलं. बायजूस, अनअकॅडमी, वेदांतू, व्हाईटहॅट ज्युनियर, ओला कंपन्यांकडून मोठी कपात केली. एमएनसी अर्थात बहुराष्ट्रीय आयटी कंपन्यांमध्ये काम करणं अनेकांचं स्वप्न असतं. तिथल्या वर्क कल्चरची अनेकांना भुरळ पडलेली असते. पण मंदीचं कारण देत याच कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवलाय. त्यामुळे याच वर्क कल्चर आणि कंपन्यांची काळी बाजूही यानिमित्तानं समोर आलीय.