जीभ कापली तरीही महिला बोलायला लागली; ऑपरेशन करणारे डॉक्टरही झाले शॉक

Shocking News : ब्रिटनमध्ये हा आश्चर्यकारक प्रकार घडला आहे. जेम्मा वीक्स (वय 37 वर्षे) असे या महिलेचे नाव आहे. या महिलेच्या जिभेच्या टोकावर एक छोटासा पांढरा डाग होता आणि तिला याचा त्रास होत होता. यानंतर तिच्या जिभेला मोठे छिद्र पडले. तीला इतका त्रास होत होता की तिला जेवता देखील येत नव्हते.

Updated: Apr 13, 2023, 05:48 PM IST
जीभ कापली तरीही महिला बोलायला लागली; ऑपरेशन करणारे डॉक्टरही झाले शॉक title=

Shocking News :  मेडिकल क्षेत्रात इतकी प्रगती झाली की असाध्य गोष्ट देखील सहज साध्य होतात. मात्र, ब्रिटनमध्ये एक अशी घटना घडली आहे ज्यामुळे ऑपरेशन करणारे डॉक्टरही झाले शॉक झाले आहेत. जीभ कापल्यानंतर देखील ही महिला बोलू लागली आहे. जीभ कापल्यावर बोलू शकणार नाही असे डॉक्टरांनी या महिलेला ऑपरेशनपूर्वी सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र, जे घडलं ते पाहून डॉक्टरही अचंबित झाले.

ब्रिटनमध्ये हा आश्चर्यकारक प्रकार घडला आहे. जेम्मा वीक्स (वय 37 वर्षे) असे या महिलेचे नाव आहे. या महिलेच्या जिभेच्या टोकावर एक छोटासा पांढरा डाग होता आणि तिला याचा त्रास होत होता. यानंतर तिच्या जिभेला मोठे छिद्र पडले. तीला इतका त्रास होत होता की तिला जेवता देखील येत नव्हते.

कर्करोगाचे निदान 

जेम्मा डॉक्टरांकडे  तपासणीसाठी गेली असता तिला कर्करोग झाल्याचे निदान झाले. हा चौथ्या स्टेजचा कॅन्सर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कॅन्सर आणकी पसरु नये म्हणून जीभ कापावी लागेल असे डॉक्टरांनी या महिलेलाल सांगितले. तसेच जीभ कापल्यानंतर बोलता येणार नाही असे देखील डॉक्टरांनी  जेम्मा हिला सांगितले.

ऑपरेशननंतर आश्चर्य घडले

ऑपरेशननंतर काही दिवसांनी ही महिला डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेली असता डॉक्टरांना देखील शॉक बसला. कारण,  जेम्मा डॉक्टरांशी बोलत होती.  जेम्माचे उच्चार स्पष्ट नव्हते पण ती बोलत होती. सुरुवातील  जेम्मा काय बोलते हे कळत नव्हते. मात्र, तिच्या कुटुंबियांना आता तिचा संवाद समजू लागला आहे.  जीभ नसेल तर माणुस बोलू शकत नाही. मात्र, जीभ कापल्यानंतर देखील महिला बोलू लागल्याने आश्चर्य व्यक्त कले जात आहे. 

कॅन्सरवर  लस तयार होतेय

देशात दरवर्षी कॅन्सर आणि ह्रदयरोगामुळे लाखो लोकांचा मृत्यू होतो. मात्र आता कॅन्सर आणि हृदयविकारावरही आता लस येणार आहे.. कोविड लसीनंतर आता अमेरिकन शास्त्रज्ञ कॅन्सर, हृदयविकारावर लस तयार करण्यात गुंतलेत.. त्यासोबतच ऑटोइम्युन विकार आणि अन्य आजारांपासून बचाव होण्यासाठी लस घेऊ शकतील. जगासह भारतात या आजारांमुळे मृत्युमुखी पडणा-यांची संख्या मोठी आहे. पाच वर्षात सर्व प्रकारच्या रोगांवर लसीद्वारे उपचार करता येऊ शकतील असा दावा मॉडर्नाचे कंपनीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पॉल बर्टन यांनी केलाय. ज्यामुळे कोणत्याही प्रकारचा ट्यूमर, कॅन्सर नष्ट होऊ शकणार आहे.