Rupert Murdoch Wife : 93 वर्षीय मीडिया टायकून रुपर्ट मर्डोक पाचव्यांदा चढले बोहल्यावर, 'या' रशियन सुंदरीशी केलं लग्न

Rupert Murdoch Marriage : 2022 मध्ये मीडिया टायकून रुपर्ट यांनी मॉडेल आणि अभिनेत्री जेरी हॉलला घटस्फोट दिल्यानंतर आता ते पाचव्यांदा बोहल्यावर चढले आहेत. अब्जाधीश गुंतवणूकदार आणि रशियन राजकारणी अलेक्झांडर झुकोवा यांच्याशी लग्न केलंय. 

नेहा चौधरी | Updated: Jun 3, 2024, 01:01 PM IST
Rupert Murdoch Wife : 93 वर्षीय मीडिया टायकून रुपर्ट मर्डोक पाचव्यांदा चढले बोहल्यावर, 'या' रशियन सुंदरीशी केलं लग्न title=
Media tycoon rupert murdoch 92 year old will marry for 5th time Wife elena zhukova

Rupert Murdoch Marriage : प्रेम आंधळं असतं, प्रेमात वयाला मर्यादा नसते असं मानलं जातं. आता मीडिया किंग अशी ओळख असलेले अब्जाधीश उद्योगपती रुपर्ट मरडॉक यांनी हे सिद्ध केलंय. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी पाचव्यांदा लग्न केलंय. मर्डोक यांनी 67 वर्षीय रशियन निवृत्त आण्विक जीवशास्त्रज्ञ एलेना झुकोवा यांच्याशी कॅलिफोर्नियातील बेल एअरमधील फार्महाऊसवर लग्न केलं. मार्चमध्ये दोघांनी साखरपुडा केला होता.

रूपर्ट-झुकोवा यांची भेट कशी झाली? 

काही अहवालांनुसार रुपर्ट मरडॉक यांची निवृत्त आण्विक शास्त्रज्ञ झुकोवा यांच्याशी भेट त्यांची तिसरी पत्नी वेंडी डेंग यांनीच घडवून आणली होती. कौटुंबिक कार्यक्रमात ही भेट झाली. त्यानंतर काही वेळ घालवल्यानंतर दोघांनीही एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तर झुकोवा यांचं हे तिसरं लग्न आहे. 

 

कोण होत्या त्यांच्या चार बायका?

पॅट्रिशिया बुकर (Patricia Booker)

पॅट्रिशिया बुकर, मेलबर्नमध्ये जन्मलेली फ्लाइट अटेंडंट आणि डिपार्टमेंट स्टोअर्सची मॉडेल, रूपर्ट मर्डोकची पहिली पत्नी होती. ती 25 वर्षांची असताना 1956 मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियात लग्न केलं होतं. हे लग्न 11 वर्ष टिकलं आणि त्यांनी 1967 मध्ये घटस्फोट घेतला. या नात्यातून एका मुलाचा जन्म झालाय. 

अण्णा तोर्व (Anna Torv)

मर्डोकने ग्लासगोमधील वृत्तपत्राच्या माजी पत्रकार अण्णा टोर्व्हशी या त्यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. टॉर्व्ह सिडनीमध्ये मर्डोकच्या डेली मिररची रिपोर्टर असताना त्यांची भेट झाली. 32 वर्षांच्या लग्नानंतर टॉर्व आणि मर्डोक 1999 मध्ये वेगळे झाले. त्यांना एलिझाबेथ, लाचलान आणि जेम्स अशी तीन मुलं आहेत. 

वेंडी डेंग  (Wendi Deng)

चिनी वंशाच्या उद्योगपती वेंडी डेंग आणि मर्डोक यांचं लग्न 14 वर्षे टिकलं. 1997 मध्ये हाँगकाँगमधील एका कॉर्पोरेट पार्टीत भेटले. त्यांना ग्रेस आणि क्लो ही दोन मुले आहेत. 2014 मध्ये घटस्फोट झाल्यानंतर दोघांचा जन्म झाला.

जेरी हॉल (Jerry Hall)

माजी सुपरमॉडेल जेरी हॉलशी पाच महिन्यांच्या प्रेमात मर्डोकने 2016 मध्ये लंडनमधील सेंट ब्राइड चर्चमध्ये लग्न केलं. हॉलने रोलिंग स्टोन्सच्या सर मिक जॅगरला 20 वर्षांहून अधिक काळ डेट केलं. त्यांना दोघांना चार मुलं आहेत.

1931 साली ऑस्ट्रेलियात जन्मलेल्या रुपर्ट मर्डोक यांची गणना मोठ्या अमेरिकन अब्जाधीशांमध्ये होते. फोर्ब्स बिलियनेअर इंडेक्सनुसार त्यांची एकूण संपत्ती 18.9 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 1.5 लाख कोटींच्या घरात आहे. रुपर्ट मर्डोक यांनी ब्रिटनमधील न्यूज ऑफ द वर्ल्ड आणि द सन ही वृत्तपत्रे 1969 मध्ये विकत घेतलं. यानंतर, त्यांनी प्रसारमाध्यमांच्या जगात खळबळ माजली.