मुंबई : चोर हे खूप चलाख असतात, ते आपल्या हात चलाखीनं कधी तुमच्याकडील गोष्ट पळवून नेतील हे तुम्हाला देखील कळणार नाही. तसेच काही चोर चोरी करतान इतकी काळजी घेतात की, कधीही यामध्ये पकडले जाणार नाही. परंतु काही लोकांचे नशीब खराब असलं तर त्यांनी कितीही मेहनत घेऊ देत त्यांच पितळ उघडं पडतंच. एका चोराच्या बाबतीत देखील असे घडलं आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या चोराने चोरी केल्यानंतर त्याच्या एका चुकीमुळे त्याला पकडण्यात आले. वास्तविक, असे घडले की, एक पत्रकार लाईव्ह रीपोर्टींग करत होता, तेव्हा चोराने त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून एगतला आणि पळ काढला. मात्र, त्याचा चेहरा कॅमेऱ्यासमोर आला आणि त्याची ओळख सर्वांसमोर उघड झाली. या आधारावर पोलिसांनी नंतर त्याला पकडले.
'द गार्डियन'च्या वृत्तानुसार, कैरोमध्ये भूकंपानंतर महमूद राघेब फेसबुकवर लाईव्ह रिपोर्टींग करत होता. तेवढ्यात मोटारसायकलवर एक माणूस आला आणि त्याचा फोन हिसकावून पळून गेला. मात्र, फोनचा कॅमेरा चालू होता, त्यामुळे नकळत त्या चोरट्याचा चेहरा फेसबुकवर आला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि काही वेळातच चोरट्याला अटक करण्यात आली.
अहवालात सांगण्यात आले आहे की, घटनेच्या काही तासांच्या आत आरोपीला त्याच्या घरातून अटक करण्यात आले आणि पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले, जिथे त्याने चौकशी दरम्यान आपला गुन्हा कबूल केला.
या संपूर्ण घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात दुचाकीस्वार सिगारेट ओढताना दिसत आहे. या दरम्यान एकदा त्याने खाली मोबाईलकडेही पाहिले, ज्यामुळे त्याचा चेहरा संपूण उघड झाला.
#اليوم_السابع
مراسل اليوم السابع كان طالع لايف يتكلم عن الزلازل التليفون اتسرق منه والواد اللي سرقه كمل اللايف pic.twitter.com/ZAyHXN53z6— Yasmin Mahmoud (@M49828376Yasmin) October 19, 2021
पोलिसांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, आरोपी व्यक्ती बेरोजगार आहे आणि त्याने चोरी केलेला फोन विकला होता. त्या चोराने चोरीचे कारण व्यक्त करत सांगितले की, तो बेरोजगार आहे. ज्यामुळे परिस्थितीने त्याला असे करण्यास भाग पाडले.