बीजिंग : Corona returns in China : चीनमध्ये कोरोना परतला आहे. कोरोना संसर्ग पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन येथील शाळा आणि विमान सेवा वाहतूक पुन्हा एकदा बंद करण्यात आली आहे. आतापर्यंत, घरगुती स्तरावर साथीच्या रोगावर नियंत्रण ठेवले गेले आहे, परंतु सलग पाचव्या दिवशी कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाचे रुग्ण हे उत्तर आणि उत्तर पश्चिम प्रांतांमध्ये आढळून आले आहेत.
चीनच्या 'ग्लोबल टाइम्स'ने बुधवारी एक इशारा जारी केला होता ज्यात कोळशाच्या आयातीवर परिणाम होईल आणि मंगोलियात सापडलेल्या नवीन संसर्गामुळे पुरवठा साखळीवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. गुरुवारपर्यंत चीनमध्ये 13 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. नवीन रुग्णवाढ लक्षात घेता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चीनने पुन्हा एकदा देशातील निर्बंध वाढवले आहेत.
कोरोनाचा धोका लक्षात लक्षात घेऊन बिजिंग आणि किमान पाच प्रांतांमध्ये कडक निर्बंध लागू. शेकडो विमानांची उड्डाणे अचानक रद्द केली आहेत. तर शाळा, चित्रपटगृहे बंद ठेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही भागांत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या नवीन लाटेत वृद्धांना झपाट्याने संसर्ग होत असल्याने त्यांना घराबाहेर पडण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. तर दुसरीकडे कोरोना चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत.
रशियातही गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मृतांची संख्या रोज एक हजारांवर गेली आहे. मंगळवारी 28 हजारांवर नवीन रुग्ण सापडले आहे. दरम्यान, संसर्ग आटोक्यात न आल्यास रशियात लॉकडाऊन जाहीर होण्याची शक्यता आहे.
2019 च्या अखेरीस, चीनच्या वुहानमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाचे पहिले प्रकरण नोंदवले गेले, ज्याने मार्च 2020 पर्यंत महामारीचे स्वरूप घेतले होते. 11 मार्च 2020 रोजी, जागतिक आरोग्य संघटनेने जग हे या प्राणघातक संसर्गाच्या विळख्यात सापडल्याचे पाहून, कोरोनाला महामारी म्हणून घोषित केले.