न्यूयॉर्क: उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतोय. याच दरम्यान उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फिरताना पाहून तेथील लोकही अवाक झाले.
अनेकांनी या व्यक्तीसोबत फोटो काढले तर काहींनी त्याला रॉकेट मॅन अशी हाकही मारली. १० तास न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर फिरल्यानंतर ही व्यक्ती ट्रम्प टॉवरजवळ पोहोचली. यावेळी या व्यक्तीने राष्ट्राध्यक्षांना भेटण्याचीही विनंती केली मात्र तेथील सुरक्षा रक्षकांनी या व्यक्तीला रिसेप्शनवरच रोखले आणि कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास नकार दिला.
खरतरं हा एक प्रँक व्हिडीओ बनवण्यात आला. ज्यात एक व्यक्ती किम जोंग उनसारखा कपडे घालतो आणि त्याच्यासारखा पेहराव घालून रस्त्यांवर फिरतो. इतकंच नव्हे तर या व्यक्तीसोबत त्याचा बॉडीगार्डही आहे.
दरम्यान जेव्हा न्यूयॉर्कमध्ये किम जोंग उनसारखी व्यक्ती रस्त्यावर फिरताना पाहून तेथील लोकही आश्चर्यचकित झाले.
किम जोंगसारखा दिसणारा व्यक्ती न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर फिरताना पाहून तेथील लोकांना आश्चर्याचा धक्का बसला. अनेकांना तर हा खरोखरच उत्तर कोरियाचा हुकूमशहा तर नाही ना असे वाटले आणि त्यांनी चक्क रस्ताच बदलला. अनेकांनी तर सेल्फीही काढले.
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. आतापर्यंत नऊ लाखाहून अधिकांनी हा व्हिडीओ पाहिलाय. तब्बल सात मिनिटांच्या या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही दिल्यात.