६,००० वर्षांपूर्वीच्या मानवी कवटीचं रहस्य...

१९२९ साली आढळलेल्या एका मानवी कवटी संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 26, 2017, 10:26 PM IST
६,००० वर्षांपूर्वीच्या मानवी कवटीचं रहस्य... title=
Representative Image

मेलबर्न : १९२९ साली आढळलेल्या एका मानवी कवटी संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे.

तब्बल ६००० वर्ष जुनी असलेली ही मानवाची कवटी जगातील सर्वात पहिली त्सुनामी पीडित व्यक्तीची असावी असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

जर्नल पीएलओएस वनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार पापुआ न्यू गिनी या परिसरात नेहमीच विनाशकारी त्सुनामी आली आहे. या त्सुनामीमुळे इतिहासात अनेक मृत्यू झाले आणि विध्वंस घडला.

ऑस्ट्रेलियामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्समध्ये वैज्ञानिक जेम्स गॉफ यांनी म्हटलं की, आम्ही शोध लावला आहे की ज्या जागेवरुन मानवी कवटी आढळली तो समुद्र किनाऱ्याचा परिसर आहे. हा परिसर ६,००० वर्षांपूर्वी आलेल्या भयंकर त्सुनामीत डुबला होता. अशीच त्सुनामी १९९८ साली आली होती आणि त्यामध्ये २,००० नागरिकांचा मृत्यू झाला होता.

गॉफ यांनी पूढे म्हटलं की, आम्ही निष्कर्ष काढला आहे की, त्या ठिकाणी त्सुनामीत मारला गेलेला व्यक्ती हा जगातील सर्वात आधी आलेल्या त्सुनामी पीडित व्यक्ती असण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ पॉल हॉसफेल्ड यांनी जवळपास ९० वर्षांपूर्वी एटापे येथून ही मानवी खोपडी शोधली होती. वैज्ञानिकांच्या एका टीमने २०१४मध्ये त्या ठिकाणी गेली होती. या टीमने प्रयोगशाळेत अभ्यासासाठी हॉसफेल्ड यांच्यातर्फे करण्यात अभ्यास केलेल्या वस्तुंचे नमुने एकत्र केले.

गॉल्फ यांनी हाडांचं चांगल्या प्रकारे अभ्यास केला आणि ज्या समुद्र किनाऱ्यावर ही कोपडी आढळली त्या ठिकाणचाही चांगला अभ्यास केला.