'या' ग्रहांवर पण जीवसृष्टीची शक्यता...वैज्ञानिकांचा मोठा दावा...

ज्या ठिकाणी पाण्याचा पुरावा मिळेल तिथे जीवनाची आशा आहे. 

Updated: Jul 16, 2022, 05:22 PM IST
'या' ग्रहांवर पण जीवसृष्टीची शक्यता...वैज्ञानिकांचा मोठा दावा... title=

Trending News :  नासाकडून विश्वाच्या निर्मितीचं रहस्य उलगडण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. त्यासाठी त्यांनी जगातील सर्वात मोठी आणि शक्तिशाली वेब स्पेस टेलिस्कोपचा वापर करत आहेत. या टेलिस्कोपद्वारे विश्वातील आकाशगंगांची रंगीत छायाचित्र घेण्यात आली आहे. आता या विशाल टेलिस्कोपबद्दल अजून एक मोठा दावा करण्यात आला आहे. 

विश्वात सर्वत्र जीवन जगता येणारे घटक असतात फक्त ते आपल्याला शोधता आले पाहिजे. विश्वात वेगवेगळ्या जागी जीवनाचा शोध घेण्यासाठी जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप सक्षम असल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. म्हणजेच हे टेलिस्कोप ज्या दिशेने फिरेल त्या त्या ठिकाणी जीवसृष्टीचा शोध लावता येणार आहे. जर या टेलिस्कोपला जीवसष्टीचे संकेत मिळाले तर ती लगेचच पृथ्वीवरील वैज्ञानिकांना संदेश देईल. 

सूर्यमालेत अनेक ठिकाणी जीवसृष्टी असल्याची आशा आहे. ज्या ठिकाणी पाण्याचा पुरावा मिळेल तिथे जीवनाची आशा आहे. चंद्रावर पाण्याचे अस्तित्व असल्याची माहिती काही नवी नाही. मंगळावर पाण्याचे स्त्रोत आढळले आहेत. मात्र इथे जीवसृष्टीबाबत काही माहिती मिळाली नाही. कारण इथे जाणं अवघड आहे. आतापर्यंत असा कुठलाही लँडर किंवा रोव्हर बनवण्यात आलेला नाही जे पृष्ठभागावरील पाण्याचे स्त्रोत शोधू शकेल. 

30 कोटी ग्रहांवर राहता येणार - वैज्ञानिक

अवकाशात इतर ठिकाणी आढळणाऱ्या पाण्यामुळे विश्वातील अनेक रहस्ये उलगडण्यास मदत होणार आहे. सूर्याव्यतिरिक्त अवकाशातील इतर ग्रहांवर जीवसृष्टी असण्याची सकारात्मक शक्यता वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, अवकाशातील 30 कोटी ग्रहांवर राहता येऊ शकतं. या ग्रहांपैकी अनेक ग्रहांचा आकार हा पृथ्वी येवढा आहे. या ग्रहांवरील जीवसृष्टी ही सध्याच्या जीवनापेक्षा बरेच प्राचीन असू शकते. आतापर्यंत वैज्ञानिकांकडून 5 हजार एक्सोप्लॅनेटचा शोध घेण्यात आला आहे. या एक्सोप्लॅनेवर जीवसृष्टी शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

इथे जीवसृष्टीची शक्यता

या टेलिस्कोपने नुकतेच WASP-96b या वायू महाकाय ग्रहावरून निघणाऱ्या प्रकाश लहरींचा अभ्यास केला. या ग्रहावर पाणी आणि ढग आढळून आले आहेत. हा ग्रह अतिशय मोठा असून उष्ण आहे. त्यामुळे तिथे जीवसृष्टी असण्याची शक्यता वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. 

तीन सर्वात शक्तीशाली दुर्बिणीची निर्मिती

जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपमुळे ग्रहांवर जीवनाचा शोध घेणे आता सोपं होणार आहे. सध्या पृथ्वीवर तीन मोठ्या दुर्बिणीची निर्मिती होते आहे. ज्या अंतराळातील इतर ग्रहांवरील बायोसिग्नेचरचा शोध घेऊ शकतात. जायंट मॅगेलन टेलिस्कोप, थर्टी मीटर टेलिस्कोप आणि युरोपियन एक्स्ट्रीमली लार्ज टेलिस्कोप अशी त्यांची नावं आहेत. या दुर्बिणी आता असलेल्या कोणत्याही दुर्बिणीपेक्षा खूप शक्तिशाली आहेत. या तिन्ही दुर्बिणीमुळे सूर्यमालेतील किंवा एक्सोप्लॅनेटवरील जीवनाचा शोध घेण्यास मदत होणार आहे.