मुंबई : तुरुंगात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ, त्यांची मुलगी मरियम आणि जावई सफदार यांनी इस्लामाबाद हायकोर्टात वेगवेगळ्या याचिका दाखल करून भ्रष्टाचार प्रकरणातील निकालाविरोधात अपील केलं होतं. या प्रकरणात जामिनावर सोडण्याची मागणीही त्यांनी केली होती.मात्र शरीफ यांच्या या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने शरीफ यांची जामिनाची मागणी फेटाळून लावली
भ्रष्टाचार प्रकरणात १० वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांनी कन्या मरियम हे दोघेही शुक्रवारी रात्री लंडनहून मायदेशात परतले. विमानतळावरच शरीफ यांना पाकिस्तानच्या नॅशनल अकाऊंटेबिलीटी ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं. तिथून हेलिकॉप्टरने शरीफ यांना इस्लामाबादला नेण्यात आलं. तिथून त्यांची रवानगी रावळपिंडीच्या अदिआला कारागृहात झाली.