Vladimir Putin: रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना अटक होणार? आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात अटक वॉरंट जारी!

Vladimir Putin Arrest : आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) युक्रेनमधील कथित युद्ध गुन्ह्यांबद्दल रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासाठी अटक वॉरंट जारी केले आहे.

Updated: Mar 18, 2023, 03:37 PM IST
Vladimir Putin: रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना अटक होणार? आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात अटक वॉरंट जारी! title=
Vladimir Putin

Arrest Warrant Against Vladimir Putin: आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने म्हणजेच आयसीसीने (ICC) शुक्रवारी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांना युक्रेनमधील युद्ध गुन्ह्यांसाठी अटक वॉरंट (Arrest Warrant) जारी केले आहे. 2022 च्या फेब्रुवारीमध्ये रशियाने युक्रेनवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतर युक्रेनने देखील रशियाला प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय न्यायालयाने ही कारवाई केली आहे. (ICC issues Putin arrest warrant on Ukraine war crime allegations Latest Marathi News)

युक्रेनमध्ये झालेल्या युद्ध गुन्ह्यांना जबाबदार असल्याच्या आरोपावरून हे वॉरंट जारी करण्यात आलंय. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या कारवाईनंतर युक्रेनने (Ukraine) पुतिन यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. ही फक्त सुरुवात आहे, असं युक्रेनने म्हटलंय.

रशियाच्या मुलांच्या हक्कांसाठीच्या आयुक्त मारिया लव्होवा-बेलोवा (Maria Lvova Belova) यांनाही आयसीसीने (ICC) वाँटेड घोषित केलं आहे. ICC कडे संशयितांना अटक (Arrest) करण्याचा अधिकार नाही. त्यामुळे व्लादिमीर पुतिन यांचं टेन्शन कमी झालंय.

आणखी वाचा - Pakistan Army Farming: पाकिस्तानची स्थिती इतकी वाईट की आता लष्कर करणार शेती; 45 हजार एकर जमीन घेतली ताब्यात

दरम्यान, न्यायालय स्थापन करून करारावर स्वाक्षरी केलेल्या देशांमध्‍ये आयसीसी अधिकारक्षेत्र वापरू शकतात. रशियाने आयसीसीच्या करारावर स्वाक्षरी केलेली नसल्यामुळे प्रत्यार्पण होण्याची शक्यता नाही.

रशिया युक्रेन संबंध

गेल्या एक वर्षात दोन्ही बाजूंचे हजारो लोक या युद्धात मारले गेलेत. युक्रेन आणि रशिया दोघांचंही मोठं नुकसानही झालं आहे. युक्रेनविषयीही पुतिन यांची मतं तीव्र आहेत आणि त्यांनी ती अनेकदा भाषणाद्वारे स्पष्टपणे मांडली आहेत. 

व्लादिमीर पुतीन यांचा प्रवास 

केजीबीचे गुप्तहेर ते राष्ट्राध्यक्ष असा व्लादिमीर पुतीन यांचा प्रवास राहिला आहे. केजीबीमध्ये 16 वर्षं गुप्तहेर म्हणून काम केल्यानंतर 1991 साली राजकारणात प्रवेश केला. 1999 साली पुतीन यांना हंगामी राष्ट्र्रपती म्हणून निवड करण्यात आली होती. चार महिन्यांनंतर ते पूर्ण वेळ राष्ट्रपती झाले आणि आजही आहेत.