Face Mask: 82 लाख रुपये देतो तोंडावरचं मास्क काढ! तिला विमानात मिळाली अजब ऑफर अन्...

$100000 Offer To Take Off Face Mask: एका विमानप्रवासादरम्यान बाजूला बसलेल्या महिलेला एका उद्योजकाने ही भन्नाट ऑफर दिली होती. मात्र या महिलेनं ही ऑफर ऐकून नेमकं काय केलं, दोघांमध्ये काय संभाषण झालं याबद्दलचा तपशील या उद्योजकाने शेअर केला आहे.

Updated: Mar 17, 2023, 09:52 PM IST
Face Mask: 82 लाख रुपये देतो तोंडावरचं मास्क काढ! तिला विमानात मिळाली अजब ऑफर अन्... title=
Tech tycoon Steve Kirsch

100000 USD Offer To Take Off Mask: मास्क (Face Mask) काढण्यासाठी तुम्हाला एखाद्या व्यक्तीने 80 लाख रुपये देऊ केले तर तुम्ही काय कराल? अर्थात मास्क काढावा की नाही याचा नक्कीच तुम्ही एकदा तरी विचार कराल. मात्र बहुतांश लोक काही क्षणासाठी मास्क उतरवल्यास एवढे पैसे मिळत असतील तर काय हरकत आहे असा विचार करतील. मात्र एका महिलेने अशा भरघोस बक्षिसाची ऑफर धुडकावली. आता तुम्ही म्हणाल की एखाद्या व्यक्तीने मस्करीमध्ये ही ऑफर या महिलेला दिली असेल पण तसं नाहीय. ही ऑफर अमेरिकी उध्योगपती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज उद्योजकांपैकी एक असलेल्या स्टीव किर्च (Tech tycoon Steve Kirsch) यांनी दिली होती. विमानातून प्रवास करताना स्टीव्ह किर्च (Steve Kirsch) यांनी ही ऑफर दिली होती. स्टीव्ह यांनी स्वत: फोटो ट्वीट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे.

82 लाखांची ऑफर

स्टीव्ह किर्च यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट नेमकं घडलं काय याबद्दलचा तपशील पोस्ट केला आहे. "मी डेल्टाच्या विमानात फर्स्ट क्लासमधून प्रवास करत होतो. माझ्या बाजूला सहप्रवाशाच्या सीटवर एक महिला बसली होती. त्या महिलेने तोंडावर मास्क लावलं होतं. मास्क लावण्याचा काहीच फायदा नसल्याचं मी तिला सांगत मास्क काढावं असं सुचवलं," असं स्टीव्ह किर्च म्हणतात.  मात्र महिलेने स्टीव्ह किर्च यांनी केलेल्या मागणीला म्हणजेच मास्क काढण्यास नकार दिला. त्यानंतर स्टीव्ह किर्च यांनी या महिलेला ऑफर दिली की, "तुम्ही मास्क काढलं तरी मी तुम्हाला 1 लाख अमेरिकी डॉलर्स (भारतीय चलनानुसार 82 लाख रुपये) देईन." मात्र स्टीव्ह किर्च यांची ही लाखमोलाची ऑफर या महिलेने धुडकावली. 

पुढे काय घडलं?

यानंतर स्टीव्ह यांनी अन्य ट्वीटमध्ये पुढे काय घडलं याबद्दल सांगितलं. मी त्या महिलेला माझी ओळखही सांगितली. मात्र या महिलेनं माझं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं केलं, असं स्टीव्ह किर्च म्हणाले. तसेच स्टीव्ह यांनी ही महिला एका औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीमध्ये काम करत असल्याचंही सांगितलं. या महिलेबरोबर नेमकी काय काय चर्चा झाली याबद्दल स्टीव्ह किर्च यांनी वेगवगेळ्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे. मी तिला 100 डॉलर्स देण्याची तयारी दर्शवत मास्क काढण्यासंदर्भातील मोबदला मोजण्यास सुरुवा केली. तिने माझी ही पहिली ऑफर धुडकावली. मी तिला मास्कचा उपयोग होत नाही हे समजावून सांगायचा प्रयत्न करत होतो पण ती समजून घ्यायला तयार नव्हती. अखेर तिला खाणं खाण्यासाठी मास्क काढावं लागलं. तिला ब्रेकफास्ट आणून दिल्यानंतर तिने लगेच तोंडावरील मास्क काढला. कारण सर्वांना ठाऊक आहे की जेवताना संसर्ग होत नाही, असा उपाहासात्मक टोला लगावत स्टीव्ह किर्च यांनी नेमकं संभाषण काय झालं हे सांगितलं. 

32 कोटी व्ह्यूज

स्टीव्ह किर्च यांच्या या ट्वीटवरुन 2 गट पडले आहेत. करोनासंदर्भात काम करणाऱ्या व्यक्तीचं असं वागणं योग्य नाही असं म्हणत काहींनी स्टीव्ह किर्च यांच्यावर टीका केली आहे. तर इतर लोकांनी या महिलेनं मास्क काढून ऑफर घ्यायला पाहिजे होती, असं म्हटलं होतं. 13 हाजारांहून अधिकव वेळा हे ट्विट रिट्विट झालं आहे. या ट्वीटला 32 कोटी 20 लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत.