Indian Temple: भारतातील एक अनोखे मंदिर; जिथे गेल्या 1000 वर्षांपासून होते मांजरीची पूजा!

Weird Temple In India: कर्नाटक (Karnataka) मध्ये असे एक अनोखे मंदिर (Weird Temple In India) आहे. जिथे मांजरीची पूजा केली जाते.  गेल्या 1000 वर्षांपासून या मंदिरात मांजरीची पूजा केली जात असल्याचे सांगितले जाते.

Updated: Oct 10, 2022, 11:56 AM IST
Indian Temple: भारतातील एक अनोखे मंदिर; जिथे गेल्या 1000 वर्षांपासून होते मांजरीची पूजा!  title=

Weird Temple In India: जेव्हा आपण कुठेतरी जात असतो आणि मांजर रस्ता ओलांडते तेव्हा ते अशुभ मानले जाते. हिंदू धर्मात (Hinduism) मांजरीला अशुभ मानले जाते. मांजर दिसल्यावर किंवा रस्तावर चालताना आडवी आली तर कपाळावर सुरकुत्या पडतात. जेव्हा मांजर रस्ता ओलांडते तेव्हा लोक देखील थोडा वेळ थांबतात. मात्र कर्नाटकमध्ये असे एक अनोखे मंदिर आहे. जिथे मांजरीची पूजा केली जाते. गेल्या 1000 वर्षांपासून या मंदिरात मांजरीची पूजा केली जात असल्याचे सांगितले जाते. (indian temple weird temple in india where cat is worship for the last 1000 years)

भारतात इथे मांजरीची पूजा केली जाते

हे अनोखे मांजरीचे मंदिर कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यापासून 30 किमी अंतरावर असलेल्या बेक्कलेले गावात आहे. या गावाचे नाव बेक्कू या कन्नड शब्दावरून पडले आहे. ज्याचा अर्थ मांजर आहे. या गावातील लोक मांजराला देवीचा अवतार मानतात आणि तिची विधीपूर्वक पूजा करतात. या गावातील लोक मांजराला मंगम्मा देवीचा अवतार मानतात.

शेवटी, अशा ओळखीचे कारण काय आहे

मान्यतेनुसार देवी मंगम्मा मांजरीच्या रूपात गावात दाखल झाली आणि गावकऱ्यांचे वाईट शक्तींपासून संरक्षण केले. त्या ठिकाणी नंतर बांबी बांधण्यात आली. तेव्हापासून येथील लोक मांजराची पूजा करतात. ही गोष्ट तुमच्यासाठी थोडी विचित्र वाटेल, पण स्थानिक लोकांचा मांजावर विश्वास आहे आणि मांजराकडे सकारात्मक दृष्टीकोनाने पाहिले जाते. 

वाचा : PAK vs NZ सामन्यात मैदानात घुसला नग्न व्यक्ती अन्...; पाहा पुढे काय झालं

गावातील लोक मांजराचे रक्षण करतात

मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील या गावातील लोक नेहमी मांजराचे रक्षण करण्यावर विश्वास ठेवतात. या गावात कोणी मांजराला इजा पोहचवली तर त्याला गावाबाहेर हाकलून दिले जाते. असे म्हणतात. तसेच, मांजराच्या मृत्यूनंतर, संपूर्ण विधी करून त्याचे दफन केले जाते. या गावात दरवर्षी मंगम्मा देवीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.