Python Video: इंद्रधनुषी अजगराचा सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकीत, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. साप आणि अजगरांचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. 

Updated: Oct 9, 2022, 07:39 PM IST
Python Video:  इंद्रधनुषी अजगराचा सौंदर्य पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकीत, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल title=

Colourful Rainbow Python: सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. साप आणि अजगरांचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. एखादी व्यक्ती निर्धास्तपण साप हाताळत असते तेव्हा आश्चर्य वाटतं. अशा व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एका व्यक्तीच्या मांडीवर रंगबेरंगी अजगर दिसत आहे. या अजगराला नेटकरी इंद्रधनुषी अजगर म्हणून संबोधत आहे.  हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेक यूजर्सनी शेअर केला आहे. व्हिडीओमधील व्यक्ती अतिशय सुंदर दिसणार्‍या अजगराशी खेळताना दिसत आहे. 

हा व्हिडीओ jayprehistoricpets नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या व्यक्तीचं नाव जे ब्रेवर असून ते कॅलिफोर्नियातील रेप्टाइल झूचे फाऊंडर आहेत.  ब्रेवर अजगर घेऊन त्याच्या सौंदर्याचं वर्णन करत आहे. जगातील सर्वात सुंदर अजगरांपैकी एक हा अजगर आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करत आहेत. एका युजर्सने लिहिलं आहे की, 'हा खराखुरा अजगर आहे की रबर आहे. काही कळत नाही. पण निसर्गाची कमाल आहे.' दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, 'कितीही सुंदर असला तरी तो अजगर आहे, जरा सांभाळूनच राहा'