कुलभूषण जाधवप्रकरणी भारत आज आंतरराष्ट्रीय कोर्टात रिपोर्ट सोपवणार

पाकिस्तानच्या तुरूंगात बंदिस्त असलेला भारतीय नागरिक कुलभूषण जाधवप्रकरणी भारत आज आंतरराष्ट्रीय कोर्टात रिपोर्ट सोपवणार आहे. आंतरराष्ट्रीय कोर्टानं यापूर्वी भारताच्या बाजूनं निकाल देताना 13 सप्टेंबरपर्यंत बाजू मांडण्याचा अवधी दिला होता. त्यानंतर 13 डिसेंबरपर्यंत पाकिस्तानला आपली बाजू मांडावी लागणार आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कोर्ट आपला निकाल देणार आहे.

Updated: Sep 13, 2017, 12:19 PM IST
कुलभूषण जाधवप्रकरणी भारत आज आंतरराष्ट्रीय कोर्टात रिपोर्ट सोपवणार title=

नेदरलँड : पाकिस्तानच्या तुरूंगात बंदिस्त असलेला भारतीय नागरिक कुलभूषण जाधवप्रकरणी भारत आज आंतरराष्ट्रीय कोर्टात रिपोर्ट सोपवणार आहे. आंतरराष्ट्रीय कोर्टानं यापूर्वी भारताच्या बाजूनं निकाल देताना 13 सप्टेंबरपर्यंत बाजू मांडण्याचा अवधी दिला होता. त्यानंतर 13 डिसेंबरपर्यंत पाकिस्तानला आपली बाजू मांडावी लागणार आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कोर्ट आपला निकाल देणार आहे.

दरम्यान माजी नेवी ऑफिसर कुलभूषण जाधव चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरीडोरला इजा पोहचवण्यासाठी बलुचिस्तानमध्ये घुसल्याचा आरोप पाकिस्तानचे मंत्री अहसान इकबाल यांनी केला आहे. ही संपू्र्ण माहिती पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कोर्टासमोर ठेवणार आहे. यापूर्वी पाकिस्तानच्या सैन्य न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. मात्र भारताने आंतरराष्ट्रीय कोर्टात धाव घेतल्याने फाशीची शिक्षेवर स्थगिती देण्यात आली आहे.