नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान सीमेवर असलेला तणाव कमी करण्याच्या उद्देशानं लष्करी कारवायांच्या महासंचालकांच्या पातळीवर चर्चा करण्याचा प्रस्ताव पाकिस्तानच्या विचाराधीन आहे.
चार वर्षांपासून ही चर्चा बंद आहे. गेल्या काही दिवसांमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना वाढल्या आहेत.
त्यामुळे पाकिस्तान DGMO पातळीवरील चर्चेचा विचार करत असल्याचं वृत्त पाकिस्तानी प्रसार माध्यमांनी दिलंय.
दुसरीकडे भारत हा पाकिस्तानसाठी धोका नसल्याचं पटवून देण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असल्याचं पाकिस्तानी संरक्षणमंत्री खुर्रम दस्तगीर खान यांनी म्हटलंय.
अमेरिका आणि पाकिस्तानदरम्यान असलेले सर्व गैरसमज दूर करण्यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचं ते म्हणाले.