भारताच्या हिताची काळजी घेतल्यास चीनच्या ओबोर प्रोजेक्टवर भारत सकारात्मक

चीनच्या "वन बेल्ट वन रोड" (ओबोर) ला भारताचा सुरूवातीपासूनच विरोध आहे. 

Updated: Dec 15, 2017, 03:07 PM IST
भारताच्या हिताची काळजी घेतल्यास चीनच्या ओबोर प्रोजेक्टवर भारत सकारात्मक title=

नवी दिल्ली : चीनच्या "वन बेल्ट वन रोड" (ओबोर) ला भारताचा सुरूवातीपासूनच विरोध आहे. 

रशियाचा आग्रह

सुरूवातीच्या विरोधानंतर आता भारताने "वन बेल्ट वन रोड" वर काही सूचना करण्याची भूमिका घेतली आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी "वन बेल्ट वन रोड" मध्ये भारताने सामील होण्यासाठी आग्रह धरला आहे. भारताने स्वत:च्या राष्ट्रीय हिताचं रक्षण करत यात सहभागी व्हावं असा आग्रह धरला आहे. यानंतर रशियाला सकारात्मक प्रतिसाद देत भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने वक्तव्य केलं आहे. जर भारताच्या भूमिकेविषयी संवेदनशीलता दाखवली गेली तर भारत याविषयी काही सूचना मांडू शकतो, असं यात म्हटलं गेलं आहे.

पाक-चीन मतभेद

पाकिस्तान आणि चीनमध्ये सीपेकच्या अंमलबजावणीवरून मतभेद आहेत. चीनने यामुळेच पाकिस्तानमधल्या तीन रोड प्रोजेक्टवर हात आखडता घेत यावरची आर्थिक मदत बंद केली आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचं हे वक्तव्य आलं आहे.

भारताचं स्थान अत्यंत महत्वाचं

चीनच्या पाकिस्तानमधल्या भूमिकेमुळे रोड प्रोजेक्ट बंद होतोय अशा बातम्या मीडीयातून येत होत्या. पण पाकिस्तानच्या यासंबंधीच्या समितीने मात्र याचं खंडन करत चीन या प्रोजेक्टची आर्थिक बाजू तपासून बघतोय. चीनकडून मान्यता मिळाल्यावर लवकरच या कामांना सुरूवात होईल असं पाकिस्तानकडून सांगण्यात आलय. "वन बेल्ट वन रोड" प्रोजेक्टमध्ये भारताचं स्थान अत्यंत महत्वाचं असल्याने, भारताच्या या नव्या वक्तव्याकडे सर्वाचंच लक्ष आहे. भारत भविष्यात काय भूमिका घेतो याकडे सगळ्या जगाचं लक्ष आहे.