इम्रान खानच्या जीवनात इतक्या स्त्रिया, तिघींशी केले लग्न

 इम्रान खान हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीपेक्षा त्यांच्या लव्ह अफेयर्समुळेच जास्त चर्चेत राहिले आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 28, 2018, 09:37 PM IST
 इम्रान खानच्या जीवनात इतक्या स्त्रिया, तिघींशी केले लग्न title=

इस्लामाबाद : पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांनी राजकीय मैदानावर बाजी मारलेय. क्रिकेट मैदानावर त्यांची कारर्कीद चांगली राहिली. १९९२ मध्ये पाकिस्तानला क्रिकेटमधील विश्व चषक मिळवून दिला. आता ते राजकारणात आहेत. दरम्यान, इम्रान खान हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीपेक्षा त्यांच्या लव्ह अफेयर्समुळेच जास्त चर्चेत राहिले आहेत. त्यांच्या जीवनात आतापर्यंत ८ स्त्रिया आल्या आहेत. देश आणि परदेशातील स्त्रियांचा यात समावेश आहे.

दरम्यान, बॉलिवूडशीही इम्रानचा संबंध आलाय. त्याचे अभिनेत्री झीनत अमान हिच्यासोबत देखील अफेर असल्याची चर्चा होती. तर २०१२ मध्ये अभिनेता अमिर खानने भर कार्यक्रमात इम्रान खानला वचन दिले होते. इम्रान खानच्या राजकारणातील विजयानंतर आपण पाकिस्तानमध्ये येऊ असं वचन दिलं होतं. आता अमिर जाणार का? याची जास्त चर्चा होत आहे. 

...तो क्या आमिर खान जाएंगे पाकिस्तान? इमरान खान से 5 साल पहले किया था ये वादा

दरम्यान, इम्रान खान यांचे चित्रकार एमा सरगेन्स यांच्यासोबत चार वर्ष अफेर होते. त्यानंतर इम्रान यांचे मॉडेल सीता व्हाईट हिच्यासोबत देखील गुटरगू होते. या दोघांना टायरियान ही मुलगी आहे.
 
हॉलिवूड स्टार गोल्डी हॉन हिच्यासोबत देखील इम्रानचे प्रेमसंबंध होते.

किताब को लेकर भिड़ीं इमरान खान की दोनों पूर्व पत्नियां, जेमिमा ने कहा करूंगी मानहानि का मुकदमा
इम्रानने ब्रिटीश मॉडेल जेमिमा मर्सेल हिच्याशी लग्न केले होते. त्यांचे लग्न नऊ वर्ष टिकले, त्यांना दोन मुलगे आहेत. दरम्यान, इम्रानचे टिव्ही अँकर अॅस्टांसिआ कूक हिच्यासोबत देखील डेट सुरु होते.

रेहम खान का दावा: इमरान खान की हैं 5 नायायज संतानें, कुछ भारत में भी
इम्रानने दुसरे लग्न पत्रकार रेहम खान हिच्यासोबत केले. त्यांचे लग्न अवघे दहा महिने टिकले. रेहम हीने बीबीसी आणि डॉन या मीडियाशी काम केले आहे. सध्या तिचे एक पुस्तक येऊ घातले आहे. या पुस्तकाच्या आधीच काही गोष्टी पुढे आल्याने इम्रानची राजकीय क्षेत्रात अडचण झाली. मात्र, इम्रान खानच्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकत सत्तेत बसण्याचा मार्ग मोकळा झालाय.

इमरान खान की पूर्व पत्नी ने वसीम अकरम के खिलाफ किए सनसनीखेज खुलासे, ये हैं आरोप

रेहमने आत्मचरित्र लिहिले असून ते सध्या खूपच चर्चेत आहे. यात इम्रान कसा होता आणि तो कसा धोकेबाज असल्याचे नमूद करण्यात आलेय.

 इमरान खान की तीसरी पत्नी ने की थी भविष्यवाणी, 'PM बनना है तो मुझसे करो शादी'

रेहम खानला घटस्फोट दिल्यानंतर इम्रानने त्याची अध्यात्मिक गुरू बुशरा मनेका पीर यांच्यासोबत लग्न केले.