व्हिडिओ : जगाला पडली हिच्या केसांची भूरळ...

तिच्या केसांमुळे जगभरात प्रसिद्ध आहे ही सहा महिन्यांची मुलगी. 

Updated: Jul 27, 2018, 01:54 PM IST
व्हिडिओ : जगाला पडली हिच्या केसांची भूरळ... title=
फोटो सौजन्य- babychanco/इंस्टाग्राम

मुंबई : केस सौंदर्यात भर घालतात, हे अगदी खरे आहे. याची प्रतिची तुम्हाला या ६ महिन्यांच्या मुलीकडे पाहुन येईल. आजकाल आपल्यापैकी अनेकजण केस गळणे, तुटणे, पांढरे होणे, दुभंगणे, वाढ न होणे, रुक्ष होणे या समस्यांमुळे त्रस्त आहेत. पण या मुलीचे केस म्हणजे निसर्गाचे वरदान आहे.

 

 

A post shared by 髪記録 / hair diary (@babychanco) on

ही मुलगी फक्त ६ महिन्यांची आहे. पण इंटरनेटवर या मुलीची चांगलीच जादू आहे. जपानच्या बेबी चांकोचे काळेभोर, घनदाट, रेशमी केस सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. चांकोचे जगभरात अनेक प्रशंसक आहेत आणि ते जलद गतीने वाढत आहेत.

 

 

A post shared by 髪記録 / hair diary (@babychanco) on

या मुलीच्या नावाने बनवलेल्या इंस्टाग्राम पेजवर सुमारे 70,000 फॉलोअर्स आहेत.

 

 

A post shared by 髪記録 / hair diary (@babychanco) on

या मुलीची आई इंस्टाग्रामवर तिचे फोटोज आणि व्हिडिओज अपलोड करत असते. तिच्या फोटोज, व्हिडिओजवर स्तुतीचा पूरच येत असतो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण फॉलोअर्स आवर्जून तिच्या फोटोज, व्हिडिओज वर कमेंट करत असतात. 

 

 

A post shared by 髪記録 / hair diary (@babychanco) on

चांकोची आई तिचे केस क्लिप्ल आणि रिबिन्सने बांधत असते. त्यात ती अधिकच क्युट दिसते. तिच्या क्यूटनेसमध्ये भर घालतात ते म्हणजे तिच्या अदा. 

 

 

A post shared by 髪記録 / hair diary (@babychanco) on

डॉक्टरांनुसार, मुलांच्या केसांची वाढ जेनेटिक्स आणि एथिनिसिटीवर अवलंबून असते. गर्भात बाळाचा संपर्क आईच्या उच्च स्तरीय हार्मोन्सशी येतो. जेव्हा बाळाचा जन्म होतो तेव्हा हार्मोनचा स्तर कमी होतो. त्यामुळे बाळाचे केस जलद गतीने वाढणे बंद होते. नवीन केस येताना आधी जूने केस गळून जातात. दुसऱ्यांदा येणार केस पूर्वीपेक्षा अधिक मजबूत असतात आणि त्यांचा रंगही वेगळा असतो. 

 

 

A post shared by 髪記録 / hair diary (@babychanco) on