पहिल्यांदा कधी आणि कुणी कुणाला Kiss केले? संशोधकांनी उत्तर शोधून काढले

पहिल्यांदा कधी आणि कुणी कुणाला Kiss केले याबाबत संशोधकांनी संशोधन केले आहे. 

Updated: Feb 15, 2024, 10:20 PM IST
पहिल्यांदा कधी आणि कुणी कुणाला Kiss केले? संशोधकांनी उत्तर शोधून काढले title=

Kiss History : प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर भावना म्हणजे प्रेम... एखाद्या व्यक्तीवर जीव जडला की दुसरं कशातच मन रमत नाही.  त्या व्यक्तीला भेटण्यासाठी त्याला पाहण्यासाठी जीव आतुर होतो. मनाच्या तार जुळल्या की जवळीक आपोआपच वाढते. यातुनच एकमेकांप्रती विश्वास वाढतो आणि नातं अधिक घट्ट होते. प्रेमातील विश्वास व्यक्त करण्याचे उत्तम माध्यम म्हणजे किस अर्थात चुंबन. पहिल्यांदा कधी आणि कुणी कुणाला Kiss केले याचे उत्तर संशोधकांनी शोधून काढले आहे. 
शारिरीक जवळीक निर्माण करताना मानवांनी एकमेकांचे चुंबन केव्हा सुरू केले हे कोणालाही माहिती नाही.  गेल्या वर्षी म्हणजे 2023 मध्ये, शास्त्रज्ञांनी एक अहवाल दिला होता यात यावर सविस्तर लिहाण करण्यात आले. 5000 वर्षांपासून लिपलॉक अर्थात स्मूच कसे करायचे हे मानवाला माहित आहे. या बाबतचे संशोधन सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.

काय सांगतो इतिहास?

सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या या अहवालात दक्षिण भारतातील कांस्ययुगीन हस्तलिखिताचा संदर्भ देण्यात आला आहे.  सुमारे 1500 ईसापूर्व काळातील हे हस्तलिखित आहेत. प्राचीन मेसोपोटेमिया आणि इजिप्तमध्ये 2500 ईसापूर्व काळात मानव एकमेकांना कुंबन करत असल्याचे पुरावे सापडले आहेत. अनेक देशांच्या प्राचीन संस्कृतींमध्ये शतकानुशतके चुंबन घेण्याची प्रथा असल्याचा दावा केला जात आहे. कोपनहेगन विद्यापीठातील ॲसिरॉलॉजीचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. ट्रोएल्स पँक अर्बोल यांनी याबाबत अधिक संशोधन केले आहे. इंडियाना विद्यापीठातील उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ डॉ. जस्टिन आर. गार्सिया यांनी देखील अनेक दावे केले आहेत. बॅबिलोनमध्ये सापडलेल्या एका प्राचीन मातीच्या गोळ्यामध्ये   एक जोडपे एकमेकांना किस करत असलेल्या स्थितीत दाखवले आहे. इ.स.पूर्व 1800 मधील ही कलाकृती आहे. चुंबनाची प्रक्रिया सुमारे 300 ईसापूर्व सुरू झाली. त्याचकाळी भारतात कामसूत्र रचले गेले. यामुळे  पहिल्यांदा कधी आणि कुणी कुणाला Kiss केले याबाबत कोणीही ठोसपणे सांगू शकत नाही. 

तब्बल 58 तास 35 मिनिटं आणि 58 सेकंद इतका प्रदीर्घ चुंबन

सर्वात जास्त काळ सलग चुंबन घेण्याच्या जागतिक स्पर्धेत नवा विश्वविक्रम नोंदवला गेलाय. तब्बल 58 तास 35 मिनिटं आणि 58 सेकंद इतका प्रदीर्घ काळ चुंबन घेऊन थायलंडमधील एका जोडप्यानं हा नवा विक्रम स्वताच्या नावावर नोंदवला. इक्काची आणि लॅक्सन तिरानरत अशी त्यांची नावं आहेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या विक्रमाची नोंद झाली आहे.