अखेर ब्रम्हांडाचे रहस्य उलगडणार; अंतराळात फिरत असलेल्या लघुग्रहावर सापडले पाणी

अखेर ब्रम्हांडाचे रहस्य अखेर उलगडणार आहे. प्रथमच अंतराळात फिरणाऱ्या लघुग्रहावर पाण्याचे स्त्रोत आढळले आहेत. नासाने हे संशोधन केले आहे. 

वनिता कांबळे | Updated: Feb 15, 2024, 05:00 PM IST
अखेर ब्रम्हांडाचे रहस्य उलगडणार; अंतराळात फिरत असलेल्या लघुग्रहावर सापडले पाणी title=

Water on Asteroid: लवकरच ब्रम्हांडाच्या निर्मीतीचे रहस्य उलगडणार आहे. अंतराळात फिरत असलेल्या लघुग्रहावर पाण्याचे स्त्रोत सापडले आहेत. यामुळे पृथ्वीवर पाणी कुठून आले याचा खुलासा होण्यास देखील मदत होणार आहे. नासाच्या सोफिया एअरबोर्न ऑब्झर्व्हेटरीने हा लघुग्रह शोधला आहे. 

हवेत उडणाऱ्या प्रयोगशाळेचे संशोधन

संशोधकांना प्रथमच अंतराळात फिरत असलेल्या लघुग्रहावर  पाण्याचे स्त्रोत सापडले आहेत.  NASA च्या SOFIA म्हणजेच Stratospheric Observatory for Infrared Astronomy ला दोन लघुग्रहांवर पाण्याचे स्त्रोत सापडले आहेत.  आइरिस (Iris) आणि मस्सालिया (Massalia) अशी या लघुग्रहांची नावे आहेत.

Stratospheric Observatory for Infrared Astronomy ही एक प्रकारची हवेत उडणारी प्रयोगशाळा आहे. एका खास विमानात Stratospheric Observatory for Infrared Astronomy प्रयोगशाळा निर्माण करण्यात आली आहे. या विमानात बसवण्यात आलेल्या विशिष्ट दुर्बिणच्या माध्यमातून अंतराळात फिरणाऱ्या लघुग्रहांचे संशोधन केले जाते. नासा आणि जर्मन एरोस्पेस सेंटर यांनी संयुक्तरित्या हे विमान ऑपरेट केले. Stratospheric Observatory for Infrared Astronomy प्रयोगशाळा फेंट ऑब्जेक्ट इन्फ्रारेड कॅमेरा (FORCAST) ने सुसज्ज आहे.  

चार पैखी दोन लघुग्रहांवर पाण्याचे स्त्रोत

Stratospheric Observatory for Infrared Astronomy ने अंतराळात एकूण चार ग्रहांचे निरीक्षण करुन त्यांचे संशोधन केले. हे चारही लघुग्रह सिलिकेटने भरलेले आहेत.  चार पैकी आयरिस आणि मसालिया दोन ग्रहावर पाण्याचे स्त्रोत आढळले आहेत.  ग्रह, उल्का आणि लघुग्रह यांच्या पृष्ठभागावर पडणाऱ्या प्रकाशाच्या वेगवेगळ्या तरंगलांबीच्या माध्यमातून निरीक्षण केले जाते. अशा प्रकारे अंतराळात पाण्याचा शोध लावला जातो. सॅन अँटोनियो येथील साउथवेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ एनिसिया एरेडोन्डो यांनी या संशोधनाबाबत अधिक माहिती दिली. जेव्ह्या एखाद्या ग्रहाची निर्मीती होत असते तेव्हा अनेक लघुग्रह उदयास येतात. यामुळे ग्रह तसेच लघुग्रह अनेक ग्रहांच्या पृष्ठभागाचे मिश्रण असतात.

यापूर्वी पृथ्वीवर पाठवलेल्या लघुग्रहांच्या नमुन्यांमध्ये पाण्याचे स्त्रोत आढळले होते. मात्र, पहिल्यांदाच अंतराळात फिरणाऱ्या लघुग्रहावर पाणी सापडले आहे. आयरीस आणि मासालिया लघुग्रहावर  कणांच्या स्वरूपात पाण्याचे स्त्रोत आढळले आहेत. या लघुग्रहांवर सूर्यप्रकाश परावर्तित झाल्यानंतर पाण्याचे स्त्रोत आढळून आले . आयरिस 199 किलोमीटर रुंद आहे आणि मासालिया 135 किलोमीटर रुंद उल्का आहे. त्यांच्या कक्षाही वेगळ्या आहेत. या दोन्ही लघुग्रहांचे ऑर्बिट देखील वेगवगळे आहेत. हे सूर्यापासून 2.39 एस्ट्रोनॉमिकल यूनिट अंतरावर आहेत. लघुग्रहांच्या माध्यमातूनच पृथ्वीवर पाणी आणे आणि येथे जीवसृष्टी अस्तित्वात आली. यामुळे हे लघुग्रह ब्रम्हांडाचे रहस्य उलगडण्यास मदत करतील असा दावा संशोधकांकडून केला जात आहे.