हॉटेलच्या बाथरुममध्ये लावला होता Hidden Camera, जोडप्याचे खासगी क्षण झाले रेकॉर्ड अन् नंतर...

Viral News: जोडपं हॉटेलमध्ये आपल्या खासगी क्षणांचा आनंद घेत असतानाच त्यांची नजर छतावर लावण्यात आलेल्या स्मोक डिटेक्टरवर गेली. रुममध्ये दोन स्मोक डिटेक्टर असल्याने त्यांना संशय आला. यानंतर मात्र त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.   

शिवराज यादव | Updated: Jul 28, 2023, 09:09 AM IST

Viral News: हॉटेलमध्ये गेल्यानंतर अनेक जोडप्यांना छुपे कॅमेरे तर लावले नसतील ना अशी चिंता सतावत असते. खासकरुन तर हनिमूनला गेलेली जोडपी याच चितेंत असतात. याचं कारण याआधी अशा अनेक घटना घडल्या आहेत. काही जोडप्यांचे असे खासगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते. दरम्यान, असाच काहीसा अनुभव अमेरिकेतील एका जोडप्याला आला आहे. टेक्सासमधील या जोडप्याने हॉटेलमध्ये छुपा कॅमेरा लावल्याचा आरोप केला आहे. त्यांनी मालकाविरोधात खटला दाखल करण्याचा इशाराही दिला आहे. बाथरुममधील आपले खासगी क्षण या कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कायली गेट्स आणि तिचा होणारा पती क्रिश्चियन कैप्रारो यांनी Airbnb कंपनीकडून मेरीलँड येथे राहण्यासाठी भाड्याने एक घर घेतलं होतं. पण जेव्हा ते आपल्या खासगी क्षणांचा आनंद घेत होते, तेव्हा त्यांची नजर घराच्या छतावर लागलेल्या स्मोक डिटेक्टरवर गेली. घरात दोन स्मोक डिटेक्टर असल्याने त्यांच्या मनात संशय निर्माण झाला. 

बेडरुमसह बाथरुममध्ये सापडला हिडन कॅमेरा

त्यांनी स्मोक डिटेक्टरची पाहणी केली असता, त्यांना त्याच्यात एक छुपा कॅमेरा सापडला. हे पाहिल्यानंतर जोडप्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तात्काळ पोलिसांना फोन केला. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून तपासणी केली असता. त्यांना बेडरुमसह बाथरुममध्य़े छुपा कॅमेरा सापडला. या घटनेनंतर जोडप्याला धक्का बसला आहे. जर आपले खासगी क्षण लीक झाले तर आपलं जगणं कठीण होईल असं त्यांनी म्हटलं आहे. 

हे प्रकरण सध्या कोर्टात आहे. कोर्टात दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांनुसार, रात्री जोडपं हॉटेलच्या बाथरुममध्ये होतं. यानंतर ते बेडवर झोपून चित्रपट पाहत होते. यावेळी धुम्रपान करत असताना क्रिश्चियनला बेडरुममध्ये दोन स्मोक डिटेक्टर लावण्यात आल्याचं दिसलं. याआधी त्याला बाथरुममध्ये एक स्मोक डिटेक्टर दिसलं होतं. हे सर्व पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. 

छुपा कॅमेरा सापडल्यानंतर जोडप्याने हॉटेलमधून निघून जाण्याचा निर्णय घेतला. याआधी त्याने पोलिसांना फोन करुन या संपूर्ण घटनेची माहिती दिली होती.या घटनेनंतर कायलीदेखील नाराज आहे. आमच्या सन्मानाला ठेस लागली असल्याचं तिने म्हटलं आहे. आम्ही अनेक दिवस रडत होतो. सारखी भीती वाटत आहे असं तिने सांगितलं आहे. 

पोलीस सध्या याप्रकरणी तपास करत आहेत. जोडप्याने व्हिडीओ इंटरनेटवर कुठे टाकले आहेत का? याची माहिती पोलीस घेत आहेत. दरम्यान हॉटेलच्या मालकाने आपण सहकार्य करण्यास तयार असल्याचं सांगितलं आहे. तसंच एखाद्या गेस्टने हे केलेलं असू शकतं अशी शंका व्यक्त केली आहे. आमचा याच्याशी काही संबंध नसल्याचा त्यांचा दावा आहे. दरम्यान हॉटेल मालकाचा भाऊ मात्र पोलिसांना कोणतंही सहकार्य करण्यास नकार देत आहे. त्याने आपल्या रुमची तपसणी करु देण्यासही नकार दिला. यानंतर पोलीस आता सर्च वॉरंट आणण्याची तयारी करत आहेत.