Weird Tradition : 'इथे' आजही स्त्री - पुरुष वावरतात विवस्त्र, 'या' 3 जमातींच्या प्रथा ऐकून बसेल धक्का

Weird Tribes : एकविसाव्या शतकात आजही जगाच्या पाठीवर अशा अनेक जमाती राहतात ज्यांच्याबद्दल जाणून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. इथे स्त्री - पुरुष आजही कपडे घालत नाहीत. 

नेहा चौधरी | Updated: Nov 21, 2023, 08:43 PM IST
Weird Tradition :  'इथे' आजही स्त्री - पुरुष वावरतात विवस्त्र, 'या' 3 जमातींच्या प्रथा ऐकून बसेल धक्का title=
Here even today men and women walk naked you will be shocked to hear the customs of these 3 african weird tribes

Weird Tribes : प्राचीन काळात मानव हा जंगलात राहायचा. निसर्गाच्या सान्निध्यात ते जगायचे. झाड्यांची पानं हे त्यांचं वस्त्र आणि कंदमुळं, जीव हे त्यांचं अन्न होतं. हळू हळू चित्र बदलत गेलं.  नागरीकरण झालं, आज 21व्या शतकात आज आपण खूप प्रगती केली आहे. पण जगाच्या पाठीवर आजही अशा जमाती राहतात. जे आजही प्राचीन काळात राहायचे तसेच आपलं जीवन व्यतित करत आहेत. ही लोक आजही विवस्त्र राहतात. खरं या जमातीच्या प्रथा ऐकून तुम्हाला धक्का बसेल. कुठल्या आहेत या जमाती आणि त्यांच्या प्रथांबद्दल जाणून घेऊयात. (Here even today men and women walk naked you will be shocked to hear the customs of these 3 african weird tribes )

कोमा जमात (Koma tribe)

हदीथी आफ्रिका वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, आफ्रिकन देशात नायजेरियामध्ये (Nigeria, Africa) 3 जमाती राहत आहेत. या जमातीतील लोक कपड्याऐवजी झाडांची पान अंग झाकण्यासाठी वापरतात. यातील पहिली जमात आहे कोमा. कोमा जमातीचे लोक अलांतिका पर्वतावर जगत आहेत. 1961 पासून त्यांना नायजेरियन मानलं जाऊ लागलं. आता त्यांच्या नावावर 17 गावं आहेत. जी शहरांपासून दूर जंगलात निसर्गाच्या सान्निध्यात राहतात. हे लोक डोंगरावर नग्नावस्थेत किंवा पाने गुंडाळून बिनधास्त फिरतात. हे लोक आजही अन्न मिळवण्यासाठी शेती आणि शिकारीवर अवलंबून असतात. याशिवाय हे लोक इतर जमातींकडून शेतीमाल खरेदी करुन आपल्या उदरनिर्वाह करतात. 

कंबारी जमात (Kambari tribe)

कंबारी ही नायजेरियन जमात देखील कपड्यांशिवाय वावरतात. ही जमात नाइगर राज्यात राहतात. या ठिकाणी ही लोक त्यांच्या शरीराचा फक्त खालचा भाग पानांनी झाकतात. खरं तर ते खालचा भागही तेव्हाच झाकतात  जेव्हा त्यांना शेतमालाची विक्री करण्यासाठी बाजारात जायचं असतं. हे लोक सामान वाहतुकीसाठी गाढवांचा उपयोग करतात. तर या लोकांच्या भाषेला कंबारी भाषा असं म्हणतात. त्याशिवाय या जमातीत पुरुषांना 4 महिलांशी लग्न करण्याची अनुमती आहे. 

हेसुद्धा वाचा - 'या' जमातीत महिला, पुरुष कमरेच्या वरती कपडे घालत नाही, तर कुटुंबातील सदस्याच्या मृत्यूनंतर महिलेचं अर्ध बोट कापतात

जिबू जमात (Jibu tribe)

जिबू जमात ही तराबा राज्यात राहतात. ही लोक देखील विवस्त्र राहतात. शरीराचा काही भाग ते झाड्यांचा पानांने झाकतात. त्याशिवाय ही लोक पानांपासून तयार केलेल्या बेडवर झोपतात. तर ज्या कालव्यातून प्राणी पाणी पितात त्याच कालव्यातील पाणी हे लोक पितात. तर लग्नासाठीही यांचं अजब नियम आहेत. एखाद्या पुरुषाला लग्न करायचं असेल तर त्याला पुरुषाला महिलेच्या कुटुंबाची 5 वर्ष आर्थिक काळजी घ्यावी लागते. या पाच वर्षात महिला आणि पुरुष शारीरिक संबंध ठेवू शकतो. या पाच वर्षात महिला गर्भवती झाली नाही. तर देव त्यांच्या लग्नाच्या विरोधात आहे, अशी या जमातीची मान्यता आहे.