अरे वा! अंतराळातही बनवू शकतो गरमागरम Frech Fries; हा VIDEO पाहिलात?

Fries in Space making Video: फ्रेंच फ्राईज हे आपल्या सर्वांचेच आवडते आहेत. त्यामुळे आपल्यालाही कायमच जिज्ञासा असते की आपण जर का हे फ्राईज स्पेसमध्ये तयार केलेत तर? सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.  

गायत्री हसबनीस | Updated: Jun 23, 2023, 05:54 PM IST
अरे वा! अंतराळातही बनवू शकतो गरमागरम Frech Fries; हा VIDEO पाहिलात? title=
June 23, 2023 | french fries in space making video goes viral on instagram

Fries in Space: आपल्या सर्वांचीच मनोमनी अशी इच्छा असेल की आपण एकदा तरी अंतराळात जावे. तेथील वातावरणाचा आपण अनुभव घ्यावा. परंतु असा एक प्रश्न आपल्याला इतक्या वर जेवण कसं बनत असेल हो? अंतराळवीरांनाही आपण हटके पद्धतीनं जेवण बनवताना पाहत असतो. सोबतच असे अनेक व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात त्यामुळे आपल्यासाठी ही एक चांगलीच पर्वणी असते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. ज्यात स्पेसमध्ये फ्राईज कसे बनवले जातील याबद्दल माहिती दिलेली दिसते आहे. फ्रेंच फ्राईज हे आपल्या सर्वांनाच आवडतात. त्यामुळे आपण असे फ्राईज हे कधीही आणि केव्हाही खाऊ शकतो. तेव्हा चला पाहुया स्पेसमध्ये कसे बरं बनतील फ्रेंच फ्राईज. 

प्रत्येक ठिकाणी एक विज्ञान आहे. त्याचसोबत आपल्याला हेही माहिती आहे की, जसं जसं आपण पृथ्वीपासून दूर जाऊ तसं तसं गुरूत्वाकर्षण कमी होत आते. पृथ्वीवर गुरूत्वाकर्षण आहे त्यामुळे आपण आपली कामं ही सहज करू शकतो. त्याचसोबत आपल्या अन्न बनवतानाही काहीच त्रास होत नाही. त्यातून अवकाशात गेलो तर तिथे काही गुरूत्वाकर्षण नाही त्यामुळे अन्न बनवणं अशा ठिकाणी हे आपल्यासाठी फारच कठीण असते. परंतु अवकाशातही आपण फ्रेंच फ्राईज कसे बनवू शकतो आणि त्यामागील विज्ञान काय आहे याबद्दल माहिती देणारा हा व्हिडीओ सध्या सगळीकडेच व्हायरल होताना दिसतो आहे. अंतराळात पॅकेज गेलेले जेवण घेऊन जाण्यापेक्षा आपण फ्रेंच फ्राईज पाहा कसे बनवू शकतो. 

हेही वाचा - व्यायामशिवाय 'या' अभिनेत्रीनं केलं Weight Loss; लवकरच झळकणार हॉलिवूडपटात!

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून तुम्ही पटॅटोचे चीप्स अथवा फ्राईज कसे बनवून शकता याबद्दल वैज्ञानिकांनीच शोध लावला आहे. या व्हिडीओत एक महिला याबद्दलची माहिती देताना दिसते आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशन झिरो ग्रॅव्हेटी असताना फ्रेंच फ्राईज कसे बनवता येतील याबद्दल ती सांगताना दिसते आहे. यात त्यांनी एक व्हिडीओ तयार केला आहे ज्यातून कळून येते की लो ग्रॅव्हिटी असतानासुद्धा बटाट्यावरील बुडबूडे हे दूर होताना दिसत आहेत. पॅराबॉलिक फ्लाइट्सवर त्यांनी हा प्रयोग केलाय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आत्तापर्यंत या व्हिडीओला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. हा व्हिडीओ अनेक लोकांनी पाहिला असून या व्हिडीओला लाईक्सही मिळाले आहेत. नेटकरीही या व्हिडीओवरखाली भन्नाट कमेंट्स करताना दिसत आहेत. तुम्ही हा व्हिडीओ पाहिला नसेल तर जरूर पाहा.