Fingers Shrink In Water: पाण्यात बऱ्याच वेळ आपली हाताची किंवा पायाची बोटं असली की त्यावर रिंकल्स येतात. पाण्यात हात किंवा पाय राहिल्यानेच असं होतं. पण पाण्यातून बाहेर आल्यानंतर थोड्या वेळातच हाताची आणि पायची बोटं आधी प्रमाणे नॉर्मल होऊ लागतात. असं का होतं याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? हाताची किंवा पायची बोटं जास्त वेळ पाण्यात राहिल्यानंतर बोटांवर सुरकुत्या येतात. चला तर जाणून घेऊया या मागचे कारण...
पाण्यात बऱ्याचवेळ हाथ किंवा पाय ठेवल्यानं आपल्या बोटांना सुरकुत्या येतात. असं काही होणं ही साधारण गोष्ट आहे. त्याच कारण म्हणजे सेबम असतं. हा एक तेलकट पदार्थाप्रमाणे आहे. त्याची कमी असणं किंवा जास्त असणं दोघी गोष्टी चिंतेचा विषय आहे. कमी सेबम असणं ही त्वचेशी असलेली मोठी समस्या असते. कमी सीबममुळे त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे पिंपल्सची समस्या होऊ शकते.
सिबम तेल जास्त असल्यानं आपण जेव्हा अंघोळ करतो तेव्हा आपल्या अंगावरून लगेच पाणी वाहून जातं. अंगावर थांबत नाही. जेव्हा आपण पाणी खूप वेळ ओततो किंवा पाण्यात आपलं शरीर ठेवतो तेव्हा आपल्या शरीरातील सीबम कमी होतं आणि पाणी शरीरात शिरायला सुरुवात होते. यामुळेच आपली त्वचा व बोटे संकुचित होऊ लागतात. बोटे सुकून संकुचित होण्याच्या या प्रक्रियेला 'ऑस्मोसिस' म्हणतात. इंग्रजीत याला 'एक्वाटिक रिंकल्स' असेही म्हणतात.
हेही वाचा : अॅडल्ट स्टार असल्यामुळे माझ्याविषयी...; स्वत:विषयी वेडंवाकडं ऐकून सनी लिओनी भावूक
जेव्हा ती व्यक्ती पाण्यातून बाहेर येते तेव्हा काही वेळाने बोटे पुन्हा मूळ स्वरूपात येतात. असे होते कारण त्वचेच्या आत असलेले पाणी हळूहळू कोरडे होऊ लागते. हात आणि पायांमध्ये केराटिन असते, जे एक प्रकारचे प्रथिन आहे. केराटिन नावाचे हे प्रथिन शरीरातील पाणी कोरडे करण्याचे काम करते. हात आणि पायांमध्ये भरपूर केराटिन असल्याने शरीराचे हे दोन्ही भाग पाण्यात लवकर संकुचन पावू लागतात.