Viral Story : नवऱ्याला लागली 1.36 कोटीची लॉटरी, बायकोने एका मिनिटात केलं भिकारी

Viral Story : एका व्यक्तीला खरंच लॉटरी (Lottery) लागली आहे, तीही 1.36 करोडची. ही लॉटरी मिळवताच त्याने हे पैसे कसे खर्च करायचे, या सर्वाची प्लॅनिंग करायला सुरूवात केली होती. मात्र पत्नीने त्याला धोका दिला आणि त्याची अवस्था पुर्वीसारखी झाली होती. 

Updated: Dec 29, 2022, 08:28 PM IST
Viral Story : नवऱ्याला लागली 1.36 कोटीची लॉटरी, बायकोने एका मिनिटात केलं भिकारी  title=

Viral Story :  तुम्हाला जर 1 कोटीची लॉटरी (Lottery) लागली, तर तुम्ही काय कराल? हा प्रश्न एकूणच तुम्ही आनंदी व्हालं. कारण जर लॉटरी लागली तर तुम्ही अनेक गोष्टी विकत घेण्याची लिस्ट बनवाल, फिरण्याचे ठिकाण निवडाल. अशा सर्व गोष्टी तुम्ही कराल. मात्र ही गोष्ट बोलण्यापुरतीची झाली. एका व्यक्तीला खरंच लॉटरी (Lottery) लागली आहे, तीही 1.36 करोडची. ही लॉटरी मिळवताच त्याने हे पैसे कसे खर्च करायचे, या सर्वाची प्लॅनिंग करायला सुरूवात केली होती. मात्र पत्नीने त्याला धोका दिला आणि त्याची अवस्था पुर्वीसारखी झाली होती. 

1.36 कोटीची लॉटरी 

या घटनेत एका पतीच रातोरात नशीब पालटलं होते. कारण त्याला तब्बल 1.36 कोटीची लॉटरी (Lottery) लागली होती. ही लॉटरी जिंकून त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ही लॉटरी जिंकल्यानंतर त्याने यापूढे गरीबांसारख जीवन जगण सोडून श्रीमंतासारख जगण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कसे लक्झरी लाईफ (Luxury life) जगता येईल याच्या विचारात तो बूडाला होता. या लॉटरीने (Lottery) घरातील कुटूंब देखील आनंदी होते.

पत्नीनं केला गेम

जर एखाद्या पतीचे नोकरीत प्रमोशन (Promotion) होते, अथवा त्याला लॉटरी लागते, त्यावेळेस त्याचा सर्वाधिक आनंद हा त्याच्या पत्नी अर्थात अर्धागिनीला होतो. मात्र या घटनेत पतीची लॉटरी (Lottery) पत्नीला पाहावली नसल्याचे दिसत आहे. कारण पत्नीने पतीने जिंकलेल्या 1.36 करोड पैकी 1 कोटी घेऊन तिच्या बॉयफ्रेंड सोबत पोबारा केला होता. 

पतीला बसला मोठा धक्का

पत्नीच्या (Wife) या कृत्याने पतीला (Husband) फार मोठा धक्का बसला आहे. त्याच्या पायाखालचीच जमीन सरकली आहे. विशेष म्हणजे त्याची पत्नी ही 3 मुलांची आई होती, आणि या सर्वांना सोडून तीने पळ काढला आहे. या घटनेनंतर पतीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

दरम्यान थायलंडमध्ये (Thailand) ही घटना घडलीय. थायलंडमधल्या एका व्यक्तीला अशा प्रकारची 1.36 करोडची लॉटरी लागली होती. या लॉटरीतील 1 कोटी घेऊन तिने बॉयफ्रेंडसोबत पळ काढला होता. आता या घटनेत पतीने पत्नीविरोधात पोलिसात तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर पोलीस पत्नीचा शोध घेत आहे.