Donald Trump Case : डोनाल्ड ट्रम्प यांना अटक झाली तर... एलन मस्क यांच्या दाव्यामुळे जगभरात खळबळ

Donald Trump Case : डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी मंगळवारी मला अटक केली जाऊ शकते, असा दावा अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी केला होता.  या वृत्तावर एलन मस्क यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प यांच्या अटकेबाबत मस्क यांनी केलेल्या दाव्यामुळे जगभरात चर्चा सुरु झाली आहे.

Updated: Mar 19, 2023, 10:00 AM IST
Donald Trump Case : डोनाल्ड ट्रम्प यांना अटक झाली तर... एलन मस्क यांच्या दाव्यामुळे जगभरात खळबळ title=

Donald Trump Case : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Former US President Donald Trump) यांच्यावर सध्या अटकेची टांगती तलवार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये सांगितले की, न्यूयॉर्कच्या (New York) सरकारी वकिलांनी काही महिलांना दिलेल्या पैशांच्या प्रकरणाची चौकशी केल्यामुळे मंगळवारी मला अटक केली जाईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी या महिलांना शारीरिक संबंधांच्या बदल्यात पैसे देऊन हे प्रकरण सार्वजनिक करू नका, असे सांगितले असल्याचा आरोप आहे. यासोबतच ट्रम्प यांच्यावर अॅडल्ट स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला (Stormy Daniels) त्यांच्या नात्याबाबत मौन बाळगण्यासाठीही करोडो रुपये दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा सध्या तपास सुरु आहे.

दुसरीकडे ट्विटरचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी केलेल्या एका वक्तव्याने नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. एलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या अटकेच्या वृत्तानंतर मोठा दावा केला आहे. जर ट्रम्प यांना अटक झाली तर 2024 च्या निवडणुकीत त्यांना मोठा विजय मिळेल, असा दावा मस्क यांनी केला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक झाल्यास पुन्हा निवडणूक जिंकता येईल, असे मस्क यांनी म्हटले आहे.

नेमकं प्रकरण काय?

न्यूयॉर्कमधील न्यायव्यवस्था अॅडल्ट स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला 2016 मध्ये मिळालेल्या 13 दशलक्ष डॉलरमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा सहभाग आहे का याचा तपास करत आहे. ट्रम्प यांच्यासोबतच्या कथित लैंगिक संबंधांबाबत डॅनियल्सने कुठेही वाच्यता करु नये यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम दिल्याचा आरोप माजी राष्ट्राध्यक्षांवर करण्यात आला आहे. ट्रम्प यांचे माजी वकील मायकेल कोहेन यांनी डॅनियल्स यांना ही रक्कम दिली होती. ट्रम्प ऑर्गनायझेशनने त्यांना 42 दशलक्ष डॉलर नुकसानभरपाई आणि अतिरिक्त बोनस म्हणून देण्यात आल्याचा दावा मायकेल कोहेन यांनी केला आहे.

न्यूयॉर्कमध्ये सुरक्षा वाढवली

अटकेची परिस्थिती पाहता डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवरील समर्थकांनाही या कारवाईला विरोध करण्यास सांगितले आहे. दुसरीकडे न्यूयॉर्कमध्ये कायदा सुव्यस्था पाहणाऱ्या अधिकाऱ्यांनी या पार्श्वभूमीवर तयारी सुरु केली आहे.