चीनमध्ये एन्ट्री केलेल्या Monkey B Virusने डॉक्टरचा मृत्यू

आता कोरोनानंतर माकडांपासून पसरणाऱ्या व्हायरसची चीनमध्ये एंट्री झाली आहे.

Updated: Jul 19, 2021, 11:08 AM IST
चीनमध्ये एन्ट्री केलेल्या Monkey B Virusने डॉक्टरचा मृत्यू title=

मुंबई : कोरोना व्हायरसची सुरुवात चीनमधून झाली होती. तर आता कोरोनानंतर माकडांपासून पसरणाऱ्या व्हायरसची चीनमध्ये एंट्री झाली आहे. मंकी बी असं या व्हायरसचं नाव आहे. इतकंच न्वहे तर या घातक व्हायरसमुळे चीनमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या व्हायरसने एक बळी घेतल्यामुळे सर्व जगाची चिंता आता वाढली आहे.

या व्हायरसमुळे एका पशुवैद्यकाचा मृत्यू झाला आहे. बिजींगमधील एका पशुवैद्यकाला मंकी बी व्हायरसची (Monkey B Virus) लागण झाली होती. चीनच्या ग्लोबल टाईम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार, 53 वर्षीय पशुवैद्य प्राण्यांवर संशोधन करणार्‍या संस्थेसाठी काम करत होते. या डॉक्टरने मार्चमध्ये 2 मृत माकडांवर संशोधन केलं होतं. 

माकडांवर केलेल्या संशोधनानंतर त्यांना मळमळ आणि उलटीचा त्रास जाणवू लागला. यानंतर या डॉक्टरवर विविध रूग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र 27 मे रोजी त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. दरम्यान त्यांच्या जवळील किंवा कुटुंबातील व्यक्तींना या संसर्गाची लागण झाली नसल्याचं समोर आलं आहे. 

हा विषाणू प्रथम 1932 मध्ये दिसून आला होता. अहवालानुसार, हा विषाणू थेट संपर्काद्वारे किंवा शारीरिक स्रावांच्या देवाणघेवाणीने पसरण्याची शक्यता आहे. या विषाणूचा मृत्यू दर 70 ते 80 टक्के असल्याची माहिती आहे.