Diego Tortoise : वयाच्या 100 व्या वर्षी 800 मुलांचा बाप झालेला हा कासव आहे तरी कुठे?

Ecudor Diego Tortoise Galapagos Tortoise: कासवांचे आयुष्य हे खुप मोठे असते. आपल्याला माहितीच आहे की ते 100 हूनही जास्त दिवस जगू शकतात. परंतु तुम्ही कधी अशी बातमी ऐकलीयं का की, 100 व्या वर्षी एक कासव हा मुलांचा बाप झाला आहे ते?

Updated: Jan 15, 2023, 05:46 PM IST
Diego Tortoise : वयाच्या 100 व्या वर्षी 800 मुलांचा बाप झालेला हा कासव आहे तरी कुठे?  title=

Ecudor Diego Tortoise Galapagos Tortoise: कासवांचे आयुष्य हे खुप मोठे असते. आपल्याला माहितीच आहे की ते 100 हूनही जास्त दिवस जगू शकतात. परंतु तुम्ही कधी अशी बातमी ऐकलीयं का की, 100 व्या वर्षी एक कासव हा मुलांचा बाप झाला आहे ते? होय, ही घडना सांतक्रुज या बेटावरील आहे. डिएगो नावाचं 100 वर्षांचं कासव हे चक्क 800 मुलांचा बाप झाला आहे. पण नक्की या कासवाची कहाणी आहे तरी काय? आणि हे कासव कुठे असतं याबद्दलची रंजक कहाणी ऐकण्याची तुम्हालाही उत्सुकता लागून राहिली असेल. सध्या जगभरात याच कासवाची चर्चा आहे. इक्वेडोरमध्ये राहणारं हे डिएगो कासव खूप प्रसिद्ध आहे. 

गलापागोस (Galapagos Tortoise) ही कासवांची प्रजाती वाचवण्यामध्ये या कासवाचं मोठं योगदान आहे. चेलोनोइडिस हडेन्सिसची ही कासवांची प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर होती परंतु चक्क या कासवानं 800 मुलांना जन्म देऊन वेगळा इतिहासही घडवला आहे. या कासवाची प्रजात वाचण्यासाठी एक विशेष मोहिम राबविण्यात आली होती. चेलोनोइडिस हडेन्सिस प्रजातीच्या कासवांच्या प्रजननामध्ये डिएगोचा मोठा हात होता. डिएगो कासवाने एकट्याने 800 कासवांना जन्म दिला आहे. डिएगो हा इक्वेडोरच्या गॅलापागोस बेटावर आढळणारं हे एक महाकाय कासव आहे. हे बेट पॅसिफिक महासागरात येतं. (diego galapagos tortoise 100 year old tortois having 800 children santacruz island)

काय आहे गलापागोसचा इतिहास? 

1960 मध्ये संपूर्ण पृथ्वीवर चेलोनोइडिस हुडेन्सिस प्रजातीची केवळ 15 कासवं शिल्लक होती यामुळे ही प्रजाती नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली. या मोहिमेतून 2000 अधिक कासवांना जन्म घालण्याचा उद्देश होता. त्यातून आता डिएगोनं आत्ताच 800 पिलांना जन्म दिल्यानंतर या 2000 कासवांना जन्म देण्याच्या उद्देशातून त्यांना आता त्यातील 800 पिल्लांना जन्म दिल्यानं या मोहिमेचं 40 टक्के काम पुर्ण केलं आहे. तेव्हा ही मोहिम 50 वर्षांपुर्वी सुरू झाली होती आणि या मोहिमेत एकूण 15 कासवांना सामील करण्यात आलं होतं. फॉस्टो लॅरेना सेंटर येथे ही मोहिम सुरू होती. डिएगो 2020 मध्ये निवृत्त झाला. 

कुठे आहे डिएगो? 

डिएगो कासवाचे वजन सुमारे 80 किलो आहे. त्याची लांबी 35 इंच आहे. डिएगोला एका निर्जन बेटावर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं आहे.