तालिबानने भारताला धमकी दिल्याचं वृत्त तालिबानच्या प्रवक्त्यांनी फेटाळलं

पाकिस्तानविरोधात कारवाई न करण्याची धमकी

Updated: Mar 4, 2019, 02:02 PM IST
तालिबानने भारताला धमकी दिल्याचं वृत्त तालिबानच्या प्रवक्त्यांनी फेटाळलं title=

नवी दिल्ली : पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानवर इथून पुढेही हल्ले सुरुच ठेवले तर भारताला याची मोठी किंमत मोजावी लागेल अशी धमकी तालिबाननं भारताला दिली अशी बातमी पुढे आली होती. पण ही बातमी चुकीचं असल्याचं तालिबानच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. भारतानं पाकिस्तानविरोधात कारवाई केल्यास भारत-अफगाणिस्तान शांतता प्रक्रियेला खिळ बसेल अशी धमकी तालिबानचे प्रवक्ते झबिउल्लाह मुजाहिद यांनी दिल्याची माहिती व्हायरल होत होती. पण तालिबानच्या प्रवक्त्यांनी एक पत्रक जारी करुन अशी कोणतीही धमकी दिली नसल्याचं आता स्पष्ट केलं आहे. भारताने पाकिस्तानात घुसून जैश-ए-मोहम्मदचे अनेक कॅम्प उध्वस्त केले होते. त्यानंतर संपूर्ण पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. भारतीय वायुदलाने जैशचे अनेक महत्त्वाच्या कॅम्पवर पहाटे हल्ला केल्याने ३०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. ज्यामध्ये जैशच्या अनेक महत्त्वाच्या दहशतवाद्यांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानात बसलेल्या अनेक दहशतवाद्यांना आणि संघटनांना भारताने जोरदार धक्का दिला होता.

पुलवामातला दहशतवादी हल्ला आणि त्यावर भारतानं पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळ उद्धवस्त करण्याची कारवाई केल्यावर आता भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये संबंध बिघडले आहेत. भारतानं पुलवामातल्या रक्तपाताचा १० पट रक्तरंजीत बदला बालाकोटमध्ये घेतला आहे. देशभरात वायुसेनेच्या कारवाईचं स्वागत होत असताना आता खऱ्या अर्थानं लढाईला सुरुवात झाली आहे. भारत-पाकिस्तानमध्ये पारंपरिक अर्थानं युद्ध टाळण्यासाठी जागतिक स्तरावर मोठे प्रयत्न आधीच सुरू झाले आहेत. पण भारत आता दहशतवादाविरोधात लढणारा सर्वात मोठा देश ठरला आहे.