हार्बिन : चीनच्या हार्बिन या शहरामध्ये कोरोनाग्रस्त महिलेने एका सुदृढ बाळाला जन्म दिला आहे. ३० जानेवारीला हार्बिन म्युन्सिपल हेल्थ कमिशनमध्ये या महिलेची प्रसुती झाल्याची माहिती डेली चायना या वेबसाईटने दिली आहे. या बाळाचं वजन ३.०५ किलो असल्याचं रुग्णालयाने सांगितलं. अनेक दिवसांच्या उपचारानंतर महिला आणि तिच्या बाळाची प्रकृती स्थिर आहे.
फोटो सौजन्य : डेली चायना
३८ महिन्यांची गरोदर असलेली ही महिला ३० जानेवारीला रुग्णालयात आली. कोरोना व्हायरसच्या धोक्यापासून बाळाचं संरक्षण करण्यासाठी डॉक्टरनांनी या महिलेचं सीझर केलं. महिलेची शस्त्रक्रिया करणाऱ्या सगळ्यांना आता पाहणीसाठी वेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. नवजात बाळाच्या दोनवेळा कोरोना टेस्ट करण्यात आल्या. सुदैवाने या दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत.