धक्कादायक! नंबर वन असूनही लोकसंख्या वाढवण्यासाठी ठेवलंय एवढं मोठं बक्षीस

चीनचा विचित्रपणा! जगात सर्वाधिक संख्या असणाऱ्या देशानंच लोकसंख्या वाढवण्यासाठी ठेवलंय एवढं मोठं बक्षीस

Updated: Jan 30, 2022, 09:10 PM IST
धक्कादायक! नंबर वन असूनही लोकसंख्या वाढवण्यासाठी ठेवलंय एवढं मोठं बक्षीस title=

बिजिंग : कोरोनामुळे जगात मोठ्या प्रमाणात लोकांच्या मृत्यूची नोंद झाली. मात्र चीनमधील खरी आकडेवारी कधी जगासमोर उघड झालीच नाही. चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोनानं आता चीनलाच बहुधा लोकसंख्या कमी होण्याची धास्ती बसली असावी. कारण एक विचित्र प्रकार चीनमधून समोर आला आहे. आता चीन पुन्हा एकदा लोकसंख्या वाढवण्याकडे लक्ष देत आहे. चीन सरकारला टेन्शन आल्यानं तिथल्या काही कंपन्यांनी आणि सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. 

मुलांना जन्म देणाऱ्यांना एका कंपनीत 1 वर्षाची सुट्टी आणि 11 लाख 50 हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाणार असल्याची चर्चा आहे. चीन पुन्हा एकदा लोकसंख्या वाढवण्याकडे लक्ष देत असल्याचं दिसत आहे. आधीच लोकसंख्येत नंबर वन असताना चीनला आपलं स्थान कमी होईल याची भीती सतावत असल्याचं दिसत आहे. 

जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश चीन घटत्या लोकसंख्येमुळे हैराण झाला आहे. चीन सरकार लोकसंख्या वाढवण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवण्याच्या तयारीत आहे. यासाठी चीनने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आपल्या देशातून वन चाइल्ड पॉलिसी हटवल. चीनला याचा विशेष फायदा होताना दिसत नाही. आता चीनने तीन मुले असलेल्या जोडप्यांना अनेक सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. या सुविधांतर्गत पालकांना बेबी बोनस, पगारी रजा, करात सूट, मुलांच्या संगोपनातील सुविधा आणि इतर काही फायदे दिले जात आहेत.

इस्रायलच्या सेंटर ऑफ पॉलिटिकल अँड फॉरेन अफेयर्सचे प्रमुख फॅबियन बुसार्ट यांनी टाइम्स ऑफ इस्रायलमध्ये लिहिलेल्या ब्लॉगमध्ये ही माहिती दिली. 3 मुलं जन्माला घालण्यासाठी लोकांना जागरूक करण्यासाठी चीनच्या सरकारी अधिकाऱ्यांनी नियोजन तयार केलं आहे. 

चिनी अधिकारी संस्था आणि स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून पालकांना तिसरे मूल जन्माला घालण्यासाठी वेगवेगळ्या सुविधा देण्याच्या तयारीत आहेत. बीजिंग डाबिनॉन्ग टेक्नॉलॉजी ग्रूप आपल्या कर्मचाऱ्यांना 90,000 युआन पर्यंत रोख रक्कम आणि 12 महिन्यांपर्यंत प्रसूती रजा आणि 9 दिवसांची सुट्टी देण्यासाठी तयार आहे. याशिवाय ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी Trip.com ने अनेक आपल्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुविधा लागू केल्या आहेत.

सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या सूचनेनुसार सरकारी आणि खासगी कंपन्यांना लोकसंख्या वाढवण्यासाठी या सूचना देण्यात आल्या आहेत. देशातील तरुणांची कमी होणारी संख्या हा चीनसाठी चिंतेचा विषय बनला आहे. 2035 पर्यंत देशातील उत्पादकांची मागणी दुप्पट करण्याचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचे उद्दिष्ट आहे. मात्र तसं झालं नाही तर त्याला सुरुंग लागू शकतो.