अमेरिकेच्या हस्तक्षेपानं चीनला मिरच्या झोंबल्या! तैवानच्या किनारपट्टीवर हवाई हल्ले

चीन विरुद्ध तैवान कोणत्याही क्षणी युद्ध पेटण्याची शक्यता, पाहा नेमकं काय कारण  

Updated: Aug 4, 2022, 06:32 PM IST
अमेरिकेच्या हस्तक्षेपानं चीनला मिरच्या झोंबल्या! तैवानच्या किनारपट्टीवर हवाई हल्ले title=

नवी दिल्ली : चीन आणि तैवानमध्ये कोणत्याही क्षणी युद्ध पेटण्याची चिन्ह आहेत. चीननं युद्धाभ्यासादरम्यान तैवानवर हवाई हल्ले केले आहेत. चीनचं समुद्रात युद्धाभ्यास वाढवला आहे. त्यामुळे आधीच तणाव निर्माण झाला. आता चीननं या अभ्यासादरम्यान थेट तैवानच्या किनारपट्टीवर मिसाईल डागले आहेत.

यामुळे तिथली परिस्थिती आणखीनच चिघळली आहे. अमेरिकेच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी यांनी तैवानचा दौरा केल्यामुळे चीनच्या संतापाचा उद्रेक झाला होता. पेलोसी तैवानमधून गेल्यानंतर आता चीननं अधिकच आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे चीन आणि तैवानमध्ये कोणत्याही क्षणी युद्ध पेटण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

युद्धाभ्यासाच्या नावाखाली चीननं थेट तैवानच्या किनारपट्टीवर दोन क्षेपणास्त्र सोडून युद्धाचा इशारा दिलाय. तर तैवानच्या संरक्षण मंत्रालयानं चीनच्या कृत्याचा निषेध केलाय. चीन आपल्या आंतरराष्ट्रीय जलमार्गावर दहशत निर्माण करू पाहतोय..मात्र चीनचे मनसुबे कधीच यशस्वी होऊ देणार नाही असं प्रतिआव्हानच तैवानच्या संरक्षण मंत्रालयानं दिलं. 

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार चीन वायू आणि जल मार्गाने युद्धाभ्यास करत आहे. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की ते सराव बारकाईने पाहत आहेत. ही सगळी परिस्थिती युद्धात बदलली जात आहे. मात्र तैवान तसं होऊ देणार नाही असं तिथल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. विनाकारण युद्धाचे वातावरण निर्माण केले जात असून हा वाद थांबविण्याच्या बाजूने आम्ही आहोत, असे निवेदनात म्हटले आहे.

तैवानवर चीनला कधीच कब्जा मिळवता आलेला नाही. मात्र तरीही चीन तैवानवर आपला हक्क सांगत आलाय. आतातर अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे चीनला चांगलीच मिरची झोंबली. त्यामुळे आता चीन आणि तैवानमध्ये कोणत्याही क्षणी युद्ध पेटण्याची चिन्ह आहे.