लंडन : ब्रिटन आणि युरोपियन युनियनमधील ट्रेड डिल संकटात सापडला आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंतची डेडलाईन दिली आहे. या कालावधीमध्ये ट्रेड डिल न झाल्यास ब्रिटन विनाशर्त युरोपीयन युनियनपासून वेगळा होईल असं जॉन्सन म्हणालेत.
याआधी युरोपीयन युनियनच्या इतर २७ सदस्यांची परवानगी घेतल्याशिवाय युनायटेड किंगडम ब्रेक्झिटचा निर्णय रद्द करू शकते, असा निर्वाळा युरोपियन कोर्ट ऑफ जस्टिसने दिला आहे. ब्रिटनच्या सदस्यत्वाच्या नियमांमध्ये फेरफार न करता देखील हे करता येऊ शकते असेही युरोपियन कोर्ट ऑफ जस्टिसने म्हटलेले आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे कट्टर विरोधक अॅलेक्सी नॅव्लनी यांच्यावर ओमस्कमधल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर जर्मनीमध्ये विषप्रयोग करण्यात आला होता त्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना तातडीने रशियात आणण्यात आलं. त्यांना ओमस्कमधल्या हॉस्पिटलमध्ये नेतानाची दृश्य एका मोबाईलमध्ये चित्रित झाली आहेत. सध्या ते उपचारांना प्रतिसाद देत असल्याचं हॉस्पिटलनं सांगितले आहे.
न्यू मेक्सिको सिटीमधल्या निर्माणाधीन विमानतळाला अक्षरशः दलदलीचं स्वरुप आलंय. मेक्सिकोच्या माजी अध्यक्षांनी हा प्रक्लप उभारण्यासाठी १३ अब्ज अमेरिकन डॉलर्सचा खर्च मंजूर करून ब्रिटीश वास्तूरचनाकारांनाही बोलावलं होतं. मात्र अँड्रेस मॅन्युअल लोपेझ ऑब्रेडॉर यांनी राष्ट्राध्यक्षपदी येताच या प्रकल्पाच्या खर्चाला कात्री लावली.
फ्रान्सचे कृषीमंत्री ज्युलियन डे नॉरमॅन्डी आणि अंतर्गत व्यवस्था मंत्री गेराल्ड डारमानिन यांनी उत्तर फ्रान्सच्या ऑयसे भागात पाहणी केली. इथल्या काही घोड्यांवर हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी एका ५० वर्षांच्या संशयिताला अटक करण्यात आली आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून ते गेल्या महिन्यापर्यंत जवळपास २० घोडे मारले गेलेत तर अनेक घोड्यांचे अवयव कापण्यात आलेत.