कॉम्प्यूटर सिस्टीम बिघडल्यामुळे ब्रिटिश एअरवेजची सगळी विमानं रद्द

शनिवारी ब्रिटिश एअरवेजची सगळी विमानं तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आली.

Updated: May 28, 2017, 01:05 PM IST
कॉम्प्यूटर सिस्टीम बिघडल्यामुळे ब्रिटिश एअरवेजची सगळी विमानं रद्द  title=

लंडन : शनिवारी ब्रिटिश एअरवेजची सगळी विमानं तांत्रिक बिघाडामुळे रद्द करण्यात आली. लंडनमधील दोन प्रमुख विमानतळांवरुन होणारी ब्रिटीश एअरवेजची संध्याकाळी ५ पर्यंतची सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली होती.

ब्रिटीश एअरवेज या कंपनीच्या कॉम्प्यूटर सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे विमान उड्डाणात अडथळे येत होते त्यामुळे ही विमानसेवा काही काळासाठी बंद ठेवण्यात आली. ऐनवेळी विमानं रद्द झाल्यानं ब्रिटीश एअरवेजनं प्रवास करणा-या सर्व प्रवाशांची गैरसोय झाली. विमानसेवा रद्द झाल्यामुळे हीथ्रो, बेलफास्ट आणि गॅटविक टर्मिनलवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती.